Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

युद्धाच्या संकटात कच्च्या तेलाचे काय..? ; सरकारने सांगितलेय रशियाच्या तेलाचे गणित; पहा, आपल्याला किती मिळतेय तेल..

दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाल्याची भीती दूर करत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी सोमवारी राज्यसभेत सांगितले की, रशियाकडून कच्च्या तेलाची आयात एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. चालू आर्थिक वर्षात जानेवारीपर्यंत एकूण आयातीच्या केवळ 0.2 टक्के आयात होते. ते म्हणाले, की आपल्याला दररोज एकूण 50 लाख बॅरल तेलाची गरज आहे. यातील 60 टक्के तेल आखाती देशातून येते. रशियाकडून फक्त 4.19 लाख मेट्रिक टन आयात केले आहे जे एकूण आयातीच्या 0.2 टक्के आहे.

Advertisement

रशियाकडून तेल आयातीबाबत ज्या काही बातम्या येत आहेत, त्याच्या विरुद्ध तेल खरेदीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOCL) 30 लाख बॅरल कच्च्या तेलाच्या आयातीसाठी रशियन तेल कंपनीबरोबर करार केला आहे, असे ते म्हणाले. सन 2020-21 या आर्थिक वर्षात भारताने आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी 85 टक्के आणि नैसर्गिक वायू 54 टक्के आयात केला. प्रामुख्याने इराक, सौदी अरेबिया, युएई, नायजेरिया आणि अमेरिका येथून कच्चे तेल मागवले जाते. रशियाकडून कच्च्या तेलाची आयात एक टक्क्यांहून कमी आहे.

Advertisement

ते म्हणाले की, जागतिक ऊर्जा बाजारातील अत्यंत अस्थिरतेच्या सध्याच्या परिस्थितीत सरकार परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे आणि सध्या हायड्रोकार्बन ऊर्जा करारांवर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही. भारतीय तेल कंपन्यांनी रशियामध्ये आतापर्यंत सुमारे 16 अब्ज अमेरिकन डॉलर गुंतवणूक केली आहे. 2020-21 मध्ये भारताने अमेरिकेकडून 14 मेट्रिक दशलक्ष टन कच्चे तेल आयात केले. चालू आर्थिक वर्षात अमेरिकेमधून कच्च्या तेलाची आयात 16.8 दशलक्ष टन किंवा सुमारे $10 अब्जपर्यंत वाढू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

Loading...
Advertisement

पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होणार का..? ; जागतिक बाजारातील घडामोडींकडे तेल कंपन्यांचे दुर्लक्ष; जाणून घ्या, कच्चे तेलाचे दर किती घटले

Advertisement

खबरदार..! रशियाला मदत केली तर.. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला थेट धमकीच दिली; जाणून घ्या, काय आहे प्रकार..

Advertisement
Advertisement

Leave a Reply