Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पोस्टाची जबरदस्त योजना..! कमी गुंतवणुकीत मिळतील जास्त पैसे; पहा, काय मिळतात फायदे..

मुंबई : जर तुम्ही मर्यादीत स्वरुपात गुंतवणूक (Investment) करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण पोस्ट ऑफिसने (Post Office) तुमच्यासाठी एक उत्तम योजना आणली आहे. ज्यामध्ये तुम्ही कमी गुंतवणुकीत चांगला फायदा मिळवू शकता. इतकेच नाही तर या योजनेअंतर्गत तुम्हाला विम्यासह (Insurance) इतर फायदेही मिळतात. या योजनेत सहभागी होण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पोस्ट ऑफिस योजना शेअर बाजारावर (Share Market) अवलंबून नाही. त्यामुळे तुमचे पैसे कोणत्याही धोक्याशिवाय सुरक्षित आहेत.

Advertisement

ही योजना देशातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध आहे. पोस्ट ऑफिसद्वारे ऑफर केलेली आरडी (RD) ही मध्यम मुदतीची बचत योजना म्हणून ऑफर केली जाते. या योजनेद्वारे ठेवीदार त्याची गुंतवणूक किमान 5 वर्षांसाठी करतो. आवर्ती ठेवी जोखीममुक्त मानल्या जातात कारण त्या बाजारावर अवलंबून नसतात. या योजनेंतर्गत, तुम्ही तुम्हाला हवी तितकी वर्षे पैसे गुंतवणूक करू शकता, ज्यामध्ये दर तीन महिन्यांनी चक्रवाढ व्याज दिले जाते. त्यावर 5.8 टक्के व्याज दिले जाते. तुम्ही जितके जास्त पैसे गुंतवणूक करताल तुमची रक्कम त्याच रकमेने वाढेल. त्यामुळे अल्पबचत असलेल्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते.

Loading...
Advertisement

या योजनेअंतर्गत, गुंतवणूकदार 100 रुपयांसह खाते सुरू करू शकतात आणि दरमहा किमान 10 रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. तथापि, आपण या योजनेत आपल्याला पाहिजे तितकी गुंतवणूक करू शकता. तुम्ही आरडी योजनेत बचत खात्यात (Saving Account) सहज पैसे ट्रान्सफर (Money Transfer) करू शकता. इतकेच नाही तर खातेदार त्याच्या ठेवीतील पन्नास टक्के रक्कम त्याला पाहिजे तेव्हा मिळवू शकतो.

Advertisement

दर महिन्याला 1500 रुपये जमा करा.. मिळतील 35 लाख.. जाणून घ्या, फायदेशीर आहे ‘ही’ पोस्टाची योजना..

Advertisement
Advertisement

Leave a Reply