Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पहिल्याच दिवशी खुशखबर..! आजही सोने-चांदी स्वस्त; खरेदीआधी जाणून घ्या किती रुपयांनी दर घटले..

मुंबई : सोन्याच्या दरातील (Gold Price) घसरण आजही कायम आहे. सोने आता आतापर्यंतच्या विक्रमी पातळीवरुन 4784 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे. तर, दोन वर्षांआधीच्या सर्वाधिक दरापेक्षा चांदी 8574 रुपयांनी स्वस्त झाली आहे. IBJA ने जारी केलेल्या स्पॉट रेटनुसार, आज म्हणजेच सोमवारी 24 कॅरेट सोने सराफा बाजारात 222 रुपयांनी स्वस्त होऊन 51342 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. यावर 3 टक्के जीएसटी जोडला तर तो 52882 रुपयांच्या आसपास बसतो. दुसरीकडे, चांदीवर (Silver) जीएसटी जोडल्यानंतर ते 69448 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होईल.

Advertisement

जर आपण 23 कॅरेट सोन्याबद्दल सांगितले तर आज ते 51136 रुपये प्रति 10 ग्रॅम असा दर आहे. यावर देखील 3 टक्के जीएसटी (GST) स्वतंत्रपणे आकारला जाईल म्हणजेच तुम्हाला प्रति 10 ग्रॅम 52670 रुपये मिळतील. त्याच वेळी, 22 कॅरेट सोन्याचा भाव 47029 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 3 टक्के GST सह त्याची किंमत 48439 रुपये असेल. त्यापासून बनवलेल्या दागिन्यांवर मेकिंग चार्जेस (Making Charges) आणि ज्वेलर्सचा नफा वेगळा असतो.

Advertisement

सर्वाधिक विक्री होणाऱ्या 18 कॅरेट सोन्याची किंमत आता 38507 रुपये आहे. 3 टक्के GST सह त्याची किंमत 39662 रुपये प्रति 10 ग्रॅम असेल. त्याच वेळी, आता 14 कॅरेट सोन्याचा भाव 30035 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. जीएसटीसह ते 30936 रुपये प्रति 10 ग्रॅम असेल.

Loading...
Advertisement

IBJA ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत. तथापि या वेबसाइटवर दिलेल्या दरामध्ये जीएसटीचा समावेश नाही. सोने खरेदी आणि विक्री करताना तुम्ही IBJA दराचा संदर्भ घेऊ शकता. असोसिएशनच्या मते IBJA देशभरातील 14 केंद्रांवरून सोन्या-चांदीचे सध्याचे दर घेते आणि त्याचे सरासरी मूल्य देते. सोन्या-चांदीचे सध्याचे दर किंवा त्याऐवजी स्पॉट किंमत वेगवेगळ्या ठिकाणी भिन्न असू शकते, परंतु त्यांच्या किमतींमध्ये थोडा फरक आहे.

Advertisement

Gold Price Today : आज पहिल्याच दिवशी सोन्याला झटका.. पहा, किती रुपयांचा बसलाय फटका..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply