मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. आजही भाव स्थिर आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांपेक्षाही जास्त आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीचा परिणाम आजही सर्वसामान्यांच्या खर्चाच्या बजेटवर होताना दिसत आहे.
दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रुपये तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 109.98 रुपये तर डिझेलचा दर 94.14 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत 104.67 रुपये आहे तर डिझेलची किंमत 89.79 रुपये प्रति लीटर आहे. त्याचवेळी, चेन्नईमध्येही पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते. या गोष्टी विचारात घेऊन पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज ठरवण्याचे काम तेल कंपन्या करतात. कर आणि स्वतःचे मार्जिन जोडून पेट्रोल पंपचालक लोकांना किरकोळ किमतीत पेट्रोल विकतात. हा खर्च पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही जोडला जातो.
दरम्यान, 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर देशात इंधनाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. प्रत्यक्षात मात्र, तसे काहीच घडलेले नाही. अजूनही किंमती स्थिर आहेत. काही लहान शहरांत तर पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होत आहेत. सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत आहेत. कच्चे तेल 100 डॉलर पेक्षाही कमी झाले आहे. तर दुसरीकडे भारताने रशियाकडून कमी दरात कच्चे तेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेही कंपन्यांनी इंधन दरवाढीचा विचार सध्या केला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
पेट्रोलियम कंपन्यांची लहान शहरांवर कृपा.. आजही घेतलाय ‘हा’ मोठा निर्णय.. जाणून घ्या..