दिल्ली : गुजरातमध्ये आता इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरी तयार होतील. 19 मार्च 2022 रोजी दिल्ली येथे आयोजित भारत-जपान इकॉनॉमिक फोरममध्ये जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुजरात राज्याबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. जपानच्या सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने (SMC) रविवारी सांगितले की ते इलेक्ट्रिक वाहने (EVs) आणि बॅटरीच्या स्थानिक उत्पादनासाठी 10,440 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
यामध्ये सन 2025 मध्ये सुझुकी मोटर गुजरातमध्ये 3100 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. 2026 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी तयार करण्यासाठी प्लांट उभारण्यासाठी 7300 कोटींची गुंतवणूक केली जाईल. पेट्रोल आणि डिझेल हे मर्यादित स्त्रोत आहेत हे आपणा सर्वांना माहीत आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रचंड वाढले आहेत.
दुसरीकडे, लोक यावर उपाय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांचा विचार करत आहेत. पण सीएनजी आणि डिझेल-पेट्रोलच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहने अजूनही जास्त खर्चिक आहेत. अशा परिस्थितीत, सुझुकीच्या या गुंतवणुकीमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी होऊ शकतात, कारण जेव्हा वाहने भारतात तयार होतील तेव्हा बाजारपेठेतील स्पर्धाही वाढेल. पुरवठा साखळी चांगली राहील आणि वाहनांची किंमतही कमी होईल.
दरम्यान, देशात इलेक्ट्रिक वाहनांना अद्याप अपेक्षित प्रमाणात मागणी नाही. चार्जिंग स्टेशनची कमतरती हे महत्वाचे कारण यामागे असल्याचे सांगण्यात येत आहे. चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत. त्यानंतर आता खासगी कंपन्याही मदत करण्यास पुढे येत आहेत. देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी ओला इलेक्ट्रिक देशभरात ‘हायपरचार्जर्स’ नावाने चार्जिंग नेटवर्क उभारणार आहे. या ‘हायपरचार्जर’च्या मदतीने ओला ई-स्कूटर 18 मिनिटांत 50 टक्के चार्ज होऊ शकते. कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी काही दिवसांपूर्वी ही माहिती दिली होती.
त्यांनी सांगितले होते, की कंपनी आगामी काळात चार्जिंग पायाभूत सुविधांचा विस्तार करणार आहे. ओलाने यावर्षी आपली इलेक्ट्रिक स्कूटर ओला एस1 आणि ओला एस1 प्रो लाँच केली. कंपनीने अलीकडेच देशातील काही शहरांमध्ये त्यांचे वितरण सुरू केले आहे. सोशल मीडियावर याची घोषणा करताना अग्रवाल म्हणाले होते की, ओला इलेक्ट्रिकचे भारतात 4 हजारांपेक्षा जास्त अधिक चार्जिंग पॉइंट्स स्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे. हायपरचार्जर प्रथम BPCL पेट्रोल पंपासारख्या सार्वजनिक ठिकाणी बसवले जात आहेत. त्यासोबतच निवासी संकुलात बसविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बाब्बो.. इलेक्ट्रिक कार खरेदीवर तब्बल 5 लाख रुपये अनुदान; पहा, कुणी सुरू केलीय ‘ही’ भन्नाट ऑफर..