Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आता फक्त 2 तासांत घरीच मिळणार गॅस टाकी..! ‘या’ शहरात कंपनीने सुरू केलीय कार्यवाही; पहा, आपल्याकडे कधी होणार..

मुंबई : गॅस टाकी अचानक गेल्यानंतर काय त्रास होतो, याचा अनुभव अनेकांनी घेतला असेलच. हे थोडे म्हणून की काय नवीन गॅस टाकी घरी येईपर्यंत होणारा मनस्ताप तर विचारायलाच नको. गॅस बुक केल्यानंतर किती वेळाने मिळेल याची काही शाश्वती नसते. त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो. आता मात्र, लोकांचा हा त्रास संपणार आहे. कारण, तुम्ही गॅस टाकी बुक केल्यानंतर फक्त दोन तासात टाकी तुम्हाला मिळणार आहे.

Advertisement

होय, LPG गॅस ग्राहकांसाठी ही एक आनंदाचीच बातमी आहे. आता तुम्ही बुकिंग केल्यानंतर 2 तासांच्या आत तुमच्या घरी LPG टाकी मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला एलपीजी गॅससाठी थांबावे लागणार नाही. सरकारी तेल विपणन कंपनी इंडियन ऑइल (IOCL) ने तत्काळ सेवा सुरू केली आहे. याद्वारे ग्राहकांना अवघ्या 2 तासांत गॅस टाकी देण्यात येत आहे.

Advertisement

ग्राहक IVRS, IndianOil वेबसाइट किंवा IndianOil One App द्वारे अगदी नाममात्र प्रीमियमवर सेवेचा लाभ घेऊ शकतात. त्याची सुरुवात हैदराबादमध्ये झाली आहे. इंडियन ऑइल वेळोवेळी या सुविधेबद्दल त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून माहिती देत ​​असते. आता ही सुविधा देशातील अन्य शहरांत कधी सुरू होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कंपनीने पहिल्या टप्प्यात हैदराबाद शहरात योजना सुरू केली आहे. त्यामुळे आता अन्य शहरातही लवकरच सुरू होईल, असे अपेक्षित आहे.

Loading...
Advertisement

तुम्ही फक्त मिस्ड कॉल देऊन सुद्धा एलपीजी गॅस बुक करू शकता. इंडियन ऑइलने केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे. विद्यमान ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत फोन नंबरवरून मिस कॉल देऊन रिफिल बुक करू शकतात, असे कंपनीने या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Advertisement

शेतकऱ्यांना मोफत वीज.. होळी दिवाळीला गॅस टाकी सुद्धा मोफत.. पहा, कुणी पाडलाय आश्वासनांचा पाऊस

Advertisement

अरे वा.. तर गॅस टाकी मिळेल अगदी मोफत.. चेक करा, कुणी आणलीय ‘ही’ भन्नाट ऑफर..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply