Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

महागाईने आम आदमी हैराण..! राहुल गांधी यांनी मोदी सरकारकडे केलीय ‘ही’ मागणी..

मुंबई : आगामी काळात महागाई आणखी वाढेल, असा इशारा काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी देशातील जनतेला दिला आहे. सरकारने जनतेचे महागाईपासून संरक्षण करावे व तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले की, महागाई हा सर्व भारतीयांवर कर आहे, ज्यांच्या विक्रमी वाढीमुळे रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्याआधीच गरीब आणि मध्यमवर्गीयांचे हाल झाले.

Advertisement

सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, किरकोळ महागाईचा दर फेब्रुवारीमध्ये 6.07 टक्क्यांच्या आठ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आणि कच्च्या तेल आणि इतर वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे घाऊक किमतीवर आधारित महागाई 13.11 टक्क्यांवर पोहोचली आहे.

Advertisement

याआधीही राहुल गांधी यांनी अनेक मुद्द्यांवरून भाजपवर निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये जनतेला दिलासा देण्याची जबाबदारी सरकारची नाही का, असा सवाल केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, सरकारच्या अयोग्य धोरणांचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांना सहन करावे लागत आहेत. FD – 5.1 टक्के, PPF – 7.1 टक्के, EPF – 8.1 टक्के, किरकोळ महागाई – 6.07 टक्के आणि घाऊक महागाई – 13.11 टक्के आहे.

Loading...
Advertisement

सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात महागाई अत्यंत वेगाने वाढत चालली आहे. रशिया युक्रेन युद्धाचाही त्यावर स्पष्ट परिणाम दिसून येत आहे. देशातही महागाई वेगाने वाढत चालली आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यात ज्या बाबतीत अंदाज व्यक्त केला जात होता अखेर तसेच घडले आहे. फेब्रुवारी महिन्यातील महागाईची आकडेवारी समोर आली आहे. घाऊक किंमत निर्देशांक जानेवारीत 12.96 टक्क्यांवरून फेब्रुवारीमध्ये 13.11 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Advertisement

फेब्रुवारी 2021 मध्ये घाऊक महागाई दर फक्त 4.83 टक्के होता. जानेवारीमध्ये घाऊक महागाईचा दर 12.96 टक्के होता. डिसेंबर 2021 मध्ये, घाऊक महागाई दर 13.56 टक्के होता. नोव्हेंबरमध्ये ही महागाई 14.23 टक्के होती. सलग अकराव्या महिन्यात घाऊक महागाईचा दर दुहेरी अंकात गेला आहे. वाढती महागाई हा सरकार, अर्थव्यवस्था आणि रिजर्व्ह बँकेसाठी गंभीर मुद्दा बनला आहे. पुढील महिन्यात रिजर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक होणार आहे. त्याआधी 16 मार्च रोजी यूएस फेडरल रिजर्व्ह व्याजदराबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. महागाई वाढल्याने रिजर्व्ह बँकेवर धोरण बदलण्याचा दबाव वाढेल.

Advertisement

कर्जाने बेहाल.. महागाईने केले हैराण; आता लोकही सरकारवर भडकले; पहा, काय सुरू आहे ‘या’ देशात..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply