Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

निवडणूक ठरणार फायद्याची..! लोकांना ‘या’ गोष्टी मिळणार एकदम मोफत; पहा, काय चाललेय ‘त्या’ राज्यात..

मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये भाजपला (BJP) पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा मंत्रिमंडळाकडे लागल्या आहेत. होळीनंतर लखनऊमध्ये शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, आदित्यनाथ यांच्या शपथविधीनंतर राज्यातील सर्वसामान्यांना काय फायदा होणार आहे. होय, यावेळी उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) केवळ वीजच नाही तर आणखीही काही गोष्टी सरकार मोफत देणार आहे. जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. आदित्यनाथ यांनी अद्याप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली नसली तरी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Advertisement

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी प्रत्येक निवडणूक प्रचारसभेत होळीच्या दिवशी गरिबांना मोफत गॅस टाकी देण्याचे मोठे आश्वासन दिले होते. भाजपने होळीआधी हे आश्वासन पूर्ण केले नसेल, पण आदित्यनाथ यांनी शपथ घेताच (Swearing ceremony) हे आश्वासन पूर्ण करतील, असे अपेक्षित आहे. ज्येष्ठ नागरिक महिलांसाठी मोफत बस प्रवास (Free Bus Travel for Senior Citizen Women) सरकार 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांना सामान्य ते वातानुकुलित बसमधून मोफत प्रवास भेट देऊ शकते. त्यादृष्टीने सरकारने तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेश रस्ते वाहतूक महामंडळानेही याबाबत सर्वेक्षण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शपथविधीनंतर लगेच ही योजनाही सुरू होणे अपेक्षित आहे.

Advertisement

उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे आश्वासनही भाजप सरकार स्थापन होताच पूर्ण करू शकते. भाजपने हे आश्वासन पूर्ण केल्यास शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज देणारे उत्तर प्रदेश हे देशातील सहावे राज्य ठरेल. इतकेच नाही तर महाविद्यालयीन विद्यार्थीनींना मोफत स्कूटी दुचाकी, भाजप जाहीरनाम्यात तरुणांना दोन कोटी टॅबलेट (Tablet) आणि लॅपटॉप (Laptop) देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासनही पूर्ण होईल, असे अपेक्षित आहे.

Loading...
Advertisement

मोफत रेशन योजनाही (Free ration scheme)  सुरू राहिल अशी शक्यता आहे. शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री आदित्यनाथ 2024 पर्यंत म्हणजेच लोकसभा निवडणुकीपर्यंत ही योजना सुरू ठेवण्याची घोषणा करू शकतात. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून तयारीही पूर्ण झाली आहे. वास्तविक, कोरोनाच्या काळापासून गरिबांसाठी मोफत रेशन योजना सुरू आहे.

Advertisement

भाजपसाठी थेट 25 वर्षांचा प्लान..! नव्या सरकारसाठी ‘या’ रणनितीवर सुरू आहे कार्यवाही..

Advertisement

वाव.. ‘या’ राज्यातील 15 कोटी लोकांसाठी खुशखबर..! सरकार लवकरच ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..

Advertisement
Advertisement

Leave a Reply