Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रेल्वेच्या खाजगीकरणाबाबत केंद्र सरकारने दिलीय महत्वाची माहिती; जाणून घ्या, तुमच्यासाठीही आहे महत्वाचे..

दिल्ली : केंद्र सरकारने रेल्वेचे खासगीकरण करणार नसल्याचे बुधवारी स्पष्ट केले. रेल्वेच्या खासगीकरणाच्या सर्व चर्चा काल्पनिक असल्याचे सरकारने म्हटले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, सरकारच्या दृष्टीने एक धोरणात्मक क्षेत्र म्हणून रेल्वेची सामाजिक जबाबदारी आहे जी व्यावसायिक व्यवहार्यतेवर लक्ष केंद्रित करून पूर्ण केली जात आहे.

Advertisement

रेल्वे मंत्री म्हणाले की, रेल्वेचे खाजगीकरण होऊ शकत नाही कारण ट्रॅक रेल्वेचे आहेत, इंजिन रेल्वेचे आहेत, स्टेशन्स आणि पॉवर लाइन्स रेल्वेच्या आहेत. याशिवाय डबे आणि सिग्नल यंत्रणा सुद्धा रेल्वेचीच आहे. माजी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी देखील स्पष्ट केले होते, की रेल्वेची रचना जटिल आहे आणि रेल्वेचे खाजगीकरण केले जाणार नाही. माल वाहतूक करणाऱ्या रेल्वेचेही खासगीकरण केले जात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

Advertisement

रेल्वेमंत्री म्हणाले, की ‘सरकारच्या दृष्टीने धोरणात्मक क्षेत्र म्हणून रेल्वेची सामाजिक जबाबदारी आहे. हे आजवर पाळले गेले आहे आणि यापुढेही तसेच होत राहील. विशेष म्हणजे, या मुद्द्यावरील चर्चेदरम्यान काँग्रेस आणि इतर काही विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सरकारवर ‘रेल्वेच्या खाजगीकरणा’कडे पावले टाकत केवळ नफा कमावणे यावर लक्ष केंद्रित केल्याचा आरोप केला आणि सांगितले की, रेल्वेचे आधुनिकीकरण करण्याचे सरकार जे सांगत आहे तो फक्त अपप्रचार आहे.

Loading...
Advertisement

रेल्वेच्या सामाजिक बांधिलकीकडे लक्ष दिल्यास तब्बल 60 हजार कोटींची सबसिडी देत ​​आहोत, हे स्पष्ट होईल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, की भाजप सरकार सत्तेत येण्याआधी रेल्वेमध्ये गुंतवणुकीचा अभाव आणि दूरदृष्टीचा अभाव होता, तंत्रज्ञान बदलत नव्हते आणि त्यामुळे रेल्वेचा बाजारातील वाटा सातत्याने कमी होत होता. मात्र, आमचे सरकार आल्यानंतर सर्वप्रथम स्वच्छतेकडे लक्ष दिले गेले. त्यानंतर स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांना काही अधिकार देण्यात आले. आज बहुतेक निविदा क्षेत्रीय अधिकारी ठरवतात, त्या रेल्वे बोर्डाकडे येत नाहीत.

Advertisement

रस्ते-रेल्वे-विमानतळ विकणे ‘कॅन्सल’, आता भाड्याने देणार..! मोदी सरकारचा निर्णय, किती निधी मिळणार पाहा..

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply