Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. पाकिस्तानमध्ये लवकरच येणार ‘हे’ मोठे संकट..? ; नवीन अहवालाने वाढलेय सरकारचे टेन्शन..

दिल्ली : आर्थिक अडचणींमुळे गरिबीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पाकिस्तानसमोर आणखी एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा परिणाम आता पाकिस्तान सरकारवर स्पष्टपणे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे पाकिस्तानमध्ये पेट्रोलियम पदार्थांची प्रचंड कमतरता जाणवत आहे.

Advertisement

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानी बँकांनी तेल कंपन्यांनाही जास्त जोखीम श्रेणीमध्ये ठेवले आहे आणि कर्ज देण्यास नकार दिला आहे. त्याचवेळी पाकिस्तानची स्थिती किती बिकट आहे, याचा अंदाज यावरूनही लावता येतो की, देशात केवळ 5 दिवसांचा डिझेलचा साठा शिल्लक आहे. डिझेलचा साठा कमी झाल्याने सरकारही अडचणीत आले आहे. एकीकडे विरोधकांच्या राजकारणाने सत्ताधारी पक्ष हैराण आहे तर दुसरीकडे डिझेलच्या टंचाईमुळे महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

Advertisement

ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) मध्ये मोजली जाणारी पाकिस्तानची सामान्य चलनवाढ 13 टक्क्यांच्या 24 महिन्यांच्या सर्वाधिक पातळीवर आहे. देशात महागाई अत्यंत वेगाने वाढत चालली आहे, त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ‘डॉन’ वृत्तपत्रानुसार, जानेवारी 2020 नंतर प्रथमच इतकी महागाई आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, पाकिस्तानमध्येही सध्या राजकीय वातावरण अस्थिर बनले आहे. महागाई आणि अन्य समस्यांनी आधीच देश अडचणीत आहे. त्यात आता विरोधकांच्या राजकारणाने सरकारला हैराण केले आहे. विरोधकांनी तर पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सुद्धा आणला आहे. विरोधकांच्या या कार्यवाहीने सरकारच्याही अडचणी वाढत चालल्या आहेत. या घडामोडींमुळे देशातील परिस्थिती सध्या अत्यंत अस्थिर बनली आहे. या परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यताही सध्या दिसत नाही. त्यामुळे आगामी काळात देशातील राजकारणात काय घडामोडी घडतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी.. आता नवा कांगावा..! म्हणे, ‘भारताने आमच्यावर…’

Advertisement

म्हणून इम्रान खान सरकार संकटात; पहा CIA ने नेमके काय करून ठेवलेय पाकिस्तानात

Advertisement
Advertisement

Leave a Reply