Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia Ukraine War : पुतिन यांच्या चौकशीसाठी अमेरिकेने मंजूर केला ‘तो’ प्रस्ताव; पहा, काय आहे अमेरिकेचा प्लान..

दिल्ली : युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर जगभरात रशियाच्या अडचणी वाढल्या आहेत. अमेरिकेने तर कठोर प्रतिबंधांची मालिकाच सुरू केली आहे. अमेरिकेकडून रोजच नवीन प्रतिबंध रशियावर टाकले जात आहे. अमेरिकेला युरोपिय देशही मदत करत आहेत. त्यामुळे जागतिक राजकारण आणि अर्थकारणात सध्या रशियाचे मोठे नुकसान होताना दिसत आहे.  अमेरिकेने रशियाला आणखी एक धक्का दिला आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या सिनेटने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि त्यांच्या प्रशासनाची युद्ध गुन्ह्यांची चौकशी करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे.

Advertisement

अमेरिकन सिनेटने मंजूर केलेल्या ठरावात म्हटले आहे, की पुतिन यांच्या सूचनेनुसार रशियन सैन्याने केलेल्या युद्ध गुन्ह्यांचा सिनेट तीव्र निषेध करते. या प्रस्तावाला दोन्ही पक्षांच्या खासदारांनी मंजुरी दिली. हा प्रस्ताव मंगळवारी सिनेटने बिनविरोध मंजूर केला. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी बुधवारी सांगितले की, युक्रेनमधील संघर्ष सोडवण्यात अमेरिका प्रयत्न करत आहे, असे आम्हाला कुठेच दिसले नाही. युक्रेनमधील संघर्ष अमेरिका सोडवू इच्छित असल्याची कोणतीही चिन्हे रशियाला दिसत नाहीत, असे रॉयटर्स या वृत्तसंस्थेचे वृत्त आहे.

Advertisement

दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, युक्रेनमधून इतर देशांमध्ये आश्रय मागणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायजेशन फॉर मायग्रेशन ((International Organization for Migration) चे प्रवक्ते पॉल डिलन यांनी जिनिव्हा येथे सांगितले की, युक्रेनमधून (Ukraine) शेजारील देशांमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या 30 लाख झाली आहे. यापैकी 1,57,000 इतर देशांचे नागरिक आहेत. युक्रेनमध्ये दर सेकंदाला सुमारे एक जण निर्वासित होत आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध (Russia Ukraine War) अजूनही थांबलेले नाही. रशियाकडून हमले सुरुच आहेत. त्यामुळे युक्रेनचे अतोनात नुकसान होत आहे. अमेरिका आणि युरोपिय देश युक्रेनला मदत करत आहेत, मात्र त्याने फारसा फरक पडल्याचे दिसत नाही. परिस्थिती दिवसेंदिवस आधिक धोकादायक होत असल्याने युक्रेनने नाटोला गंभीर इशारा दिला होता. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले होते, की नाटोने वेळीच योग्य निर्णय घेतले नाहीत, तर रशिया आपल्या सदस्य देशांना लक्ष्य करण्यास सुरुवात करेल.

Advertisement

झेलेन्स्की यांनी एका संदेशात या गोष्टी सांगितल्या होत्या. त्यांनी नाटोला युक्रेनच्या आकाशात नो-फ्लाय जोन घोषित करण्याची विनंती केली होती. रशियाने युक्रेनच्या लष्करी तळाला लक्ष्य केल्यानंतर झेलेन्स्की यांनी हे वक्तव्य केले होते. झेलेन्स्की म्हणाले होते, की जर तुम्ही आमचे आकाश बंद केले नाही तर रशियन क्षेपणास्त्रे नाटोच्या जमिनीवर पडण्यास फार वेळ लागणार नाही.

Advertisement
Advertisement

Leave a Reply