Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भारीच की.. फक्त 2 रुपये प्रति युनिट दराने चार्ज होईल कार; पहा, कुठे सुरू होतोय ‘हा’ खास उपक्रम..

दिल्ली : देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारांनी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये सध्या दिल्ली सरकार आघाडीवर आहे. फक्त चार्जिंग स्टेशनच नाही तर लोकांना कमीत कमी खर्चात वाहनांसाठी वीज पुरवठा व्हावा, यासाठीही प्रयत्न करत आहे. दिल्लीचे उर्जा मंत्री सत्येंद्र जैन यांनी अलीकडेच राज्यात 27 जूनपर्यंत 100 चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची योजना जाहीर केली, ज्यामध्ये देशातील सर्वात कमी चार्जिंग किंमत 2 प्रति युनिट असेल.

Advertisement

दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्यासाठी दिल्ली सरकारने गेल्या वर्षी इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरण लागू केले. त्यानुसार दिल्लीत प्रत्येक तीन किलोमीटर अंतरावर चार्जिंग स्टेशन बांधले जातील. याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी दिली जाणार आहे.

Advertisement

देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यात दिल्ली आघाडीवर आहे. इथल्या आम आदमी सरकारचा दावा आहे, की ते शक्य तितक्या लवकर इलेक्ट्रिक वाहनांना लोकप्रिय करण्याच्या दिशेने काम करत आहे. याशिवाय शहरभर चार्जिंग पॉइंट्सची संख्या सातत्याने वाढत आहे. अलीकडेच उर्जा मंत्री म्हणाले होते, की दिल्ली सरकार 27 जून 2022 पर्यंत 100 ईव्ही चार्जिंग स्टेशन स्थापित करेल. या स्मार्ट चार्जिंग स्टेशनवर देशातील सर्वात कमी सेवा शुल्क 2 रुपये प्रति युनिट असेल.

Loading...
Advertisement

ऊर्जामंत्र्यांनी सांगितले की, पीपीपी मॉडेल अंतर्गत 27 जूनपर्यंत शहराच्या विविध भागात 100 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन बांधले जातील. या स्टेशन्सवर एकावेळी 500 इलेक्ट्रिक वाहने चार्ज करता येतील. पहिल्या टप्प्यात दिल्ली मेट्रोच्या परिसरात 71 चार्जिंग स्टेशन्स बसवण्यात येणार आहेत. या चार्जिंग स्टेशनसाठी ट्रान्समिशन पॉवर लाइन्स आणि जमीन दिल्ली सरकार देणार आहे, तर सेवा आणि मुख्य वीज पुरवठ्यासाठी खासगी कंपनी नियुक्त करावी लागणार आहे.

Advertisement

या चार्जिंग स्टेशनवर लोक इलेक्ट्रिक कार फक्त 2 रुपये प्रति युनिट दराने चार्ज करू शकतील. दिल्लीचे ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन दावा करतात की देशातील इतर कोणत्याही शहरात इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी प्रति युनिट 10 किंवा त्याहून अधिक पैसे द्यावे लागतील.

Advertisement

वाव.. एका वेळी चार्ज होणार तब्बल 1000 इलेक्ट्रिक कार.. ‘या’ शहरात आहे सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन

Advertisement
Advertisement

Leave a Reply