Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. ‘या’ राज्यातील 15 कोटी लोकांसाठी खुशखबर..! सरकार लवकरच ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..

मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील विजयाने खूश झालेल्या भाजपने राज्यातील 15 कोटी गरीब लोकांना मोठी खुशखबर देण्याची तयारी केली आहे. नवीन सरकार 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मोफत रेशन वितरण योजनेत वाढ करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. अन्न व पुरवठा विभागाने याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून लवकरच त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.

Advertisement

उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या काळात गरिबांना मोफत रेशन देण्याची योजना सुरू करण्यात आली होती जी नोव्हेंबर 2021 पर्यंत सुरू राहणार होती. मात्र, विधानसभा निवडणुका आणि कोरोना साथरोगामुळे लोकांच्या उत्पन्नावर होणारा परिणाम पाहता राज्य सरकारने मार्च 2022 पर्यंत ही योजना सुरू ठेवण्याची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत राज्य सरकारमार्फत अंत्योदय कार्ड धारकांना 35 किलो धान्य आणि पात्र घरगुती कार्डधारकांना प्रति युनिट तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ दिले जातात. याशिवाय एक लिटर तेल, एक किलो हरभरा आणि मीठही मोफत दिले जाते.

Advertisement

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या दणदणीत विजयात मोफत रेशन योजनेचाही मोठे योगदान असल्याचे मानले जात आहे. त्यामुळेच या योजनेची मुदत 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत वाढ करण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केल्याची माहिती आहे. याप्रमाणेच निवडणुकी आधी भाजपने राज्यातील लोकांना जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण करण्याच्या दिशेनेही हालचाली सुरू केल्या आहेत. या जाहीरनाम्यात गॅस टाकी मोफतसह अन्य काही घोषणा केल्या होत्या. सरकार या घोषणा पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना मात्र मोठा दिलासा मिळणार आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. चार राज्यात भाजपने जबरदस्त विजय मिळवला आहे. त्यामुळे या राज्यात आता भाजपने सरकार स्थापन करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. अद्याप याबाबत काहीही स्पष्ट नाही. गोव्यात मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर वाद सुरू आहेत. तर उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा पराभव झाल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. येथे मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावे समोर आली आहेत. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदी आदित्यनाथ हेच कायम राहणार आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री पदासाठी यावेळी जोरदार राजकारण पहायला मिळत आहे. यावेळी तर भाजपने राज्यात 4 उपमुख्यमंत्री नियुक्त करण्याचा विचार सुरू केला आहे.

Advertisement

मणिपूर आणि गोव्याचा मुख्यमंत्री कोण..? ; पहा, काय आहे भाजप नेतृत्वाचा प्लान..

Advertisement

अखिलेश यादव यांनी भाजपला दिलाय ‘हा’ गंभीर इशारा; ‘त्या’ मुद्द्यावरही केलीय जोरदार टीका..

Advertisement
Advertisement

Leave a Reply