Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia Ukraine War : .. तर युक्रेनवर येणार आणखी मोठे संकट; पहा, कुणी दिलाय ‘हा’ गंभीर इशारा..

दिल्ली : युक्रेन आणि रशियन सैन्य यांच्यातील युद्धाचा आज 21 वा दिवस आहे. रशियाच्या आक्रमणाने युक्रेनमधील अनेक शहरे अक्षरशः उद्धवस्त झाली आहेत. लाखो लोकांना दुसऱ्या देशात आश्रय घ्यावा लागला आहे. अजूनही युद्ध सुरुच आहे. युद्धाचे संकटाबरोबर दुसरेही अनेक संकटे निर्माण होतात असे म्हटले जाते. आता त्या संभाव्य संकटाचा इशारा देण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (यूएनडीपी) ने सांगितले, की युक्रेनियन लोकांपैकी 99 टक्के किंवा 10 पैकी 9 लोकांना उपासमारीचा सामना करावा लागू शकतो किंवा युद्ध चालू राहिल्यास अत्यंत गरिबीचा सामना करावा लागू शकतो. देशाला दोन दशके मागे ढकलणारा हा काळ असू शकतो.

Advertisement

UNDP प्रशासक अचिम स्टेनर म्हणाले, की संस्था सध्या सर्वात वाईट परिस्थिती टाळण्यासाठी युक्रेनियन सरकारबरोबर आवश्यक कार्यवाही करत आहे. लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अन्न खरेदीसह रोख हस्तांतरण प्रदान करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. “संघर्ष दीर्घकाळ चालला तर, गरीबीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे, असे स्टेनर यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितले. स्टेनर पुढे म्हणाले, की जर युद्ध चालू राहिले तर आम्ही असे म्हणू शकतो की 10 पैकी 9 युक्रेनियन लोकांना अत्यंत गरिबीचा सामना करावा लागेल. “आम्ही यावरून असा अंदाज लावू शकतो की या युद्धात युक्रेनचे 18 वर्षांपर्यंतचे विकास कार्य अवघ्या 12 ते 18 महिन्यांत नष्ट होऊ शकते.”

Advertisement

याआधी युक्रेनचे वरिष्ठ सरकारी आर्थिक मार्गदर्शक ओलेग उस्टेन्को यांनी सांगितले होते, की रशियन सैन्याने आतापर्यंत किमान $100 अब्ज किमतीच्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या आहेत आणि युक्रेनचे 50 टक्के उद्योग बंद केले आहेत.

Loading...
Advertisement

दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध (Russia Ukraine War) अजूनही थांबलेले नाही. रशियाकडून हमले सुरुच आहेत. त्यामुळे युक्रेनचे अतोनात नुकसान होत आहे. अमेरिका आणि युरोपिय देश युक्रेनला मदत करत आहेत, मात्र त्याने फारसा फरक पडल्याचे दिसत नाही. परिस्थिती दिवसेंदिवस आधिक धोकादायक होत असल्याने युक्रेनने नाटोला गंभीर इशारा दिला होता. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले होते, की नाटोने वेळीच योग्य निर्णय घेतले नाहीत, तर रशिया आपल्या सदस्य देशांना लक्ष्य करण्यास सुरुवात करेल.

Advertisement

झेलेन्स्की यांनी एका संदेशात या गोष्टी सांगितल्या होत्या. त्यांनी नाटोला युक्रेनच्या आकाशात नो-फ्लाय जोन घोषित करण्याची विनंती केली होती. रशियाने युक्रेनच्या लष्करी तळाला लक्ष्य केल्यानंतर झेलेन्स्की यांनी हे वक्तव्य केले होते. झेलेन्स्की म्हणाले होते, की जर तुम्ही आमचे आकाश बंद केले नाही तर रशियन क्षेपणास्त्रे नाटोच्या जमिनीवर पडण्यास फार वेळ लागणार नाही.

Advertisement

युक्रेनच्या राष्ट्रांध्यक्षांचे हताश उद्गगार..! म्हणाले, युक्रेनने आता ‘हे’ स्वीकारले पाहिजे.. जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply