Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Electric Vehicle : तुम्हाला माहित आहे का..? ; ‘या’ इलेक्ट्रिक वाहनांना सर्वाधिक मागणी; पहा, काय आहे अहवाल..

दिल्ली : सध्या इलेक्ट्रिक वाहनांना हळूहळू मागणी वाढत चालली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या विक्रीत वाढ झाली आहे. या वर्षी जानेवारीपासून नोंदणी झालेल्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांपैकी 55 टक्के दुचाकी आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, या वर्षी जानेवारी ते मार्च 14 पर्यंत एकूण 10,707 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे, त्यापैकी 5,888 दुचाकी इलेक्ट्रिक वाहने (इलेक्ट्रिक दुचाकी आणि ई-स्कूटर) आहेत. उर्वरित 45 टक्के इलेक्ट्रिक वाहने ही ई-रिक्षा, ई-कार, ई-बस, इलेक्ट्रिक वाहने आणि ई-कार्ट आहेत.

Advertisement

जानेवारीमध्ये 1,760 इलेक्ट्रिक दुचाकींची नोंदणी झाली, तर फेब्रुवारीमध्ये 2,383 अशा वाहनांची नोंदणी झाली. त्याच वेळी, 14 मार्चपर्यंत एकूण 1,745 इलेक्ट्रिक दुचाकींची नोंदणी झाली आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, “शहरात ई-दुचाकी आणि ई-स्कूटर्सची मागणी वाढत असल्याचे ट्रेंड दिसून येते.” ते म्हणाले की, शहरात आवश्यक चार्जिंग पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी सरकारचे प्रयत्न यामागे कारणीभूत आहेत. आकडेवारी दर्शवते की जानेवारी ते मार्च 14 दरम्यान दिल्लीत ई-कारची संख्याही वाढली आहे. जानेवारीपर्यंत शहरात केवळ 147 इलेक्ट्रिक कारची नोंदणी झाली होती, फेब्रुवारीअखेर त्यांची संख्या 205 वर पोहोचली असून मार्चमध्ये आतापर्यंत 70 इलेक्ट्रिक कारची नोंदणी झाली आहे.

Loading...
Advertisement

अधिकाऱ्याने सांगितले की, ऑगस्ट 2020 मध्ये सरकारच्या इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) धोरणाच्या घोषणेनंतर ई-वाहनांच्या विक्रीत वाढ झाली आहे. ते म्हणाले की, ई-टू व्हीलर आणि ई-रिक्षाच्या खरेदीवर सबसिडी देण्याची तरतूद आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त रक्कम 30,000 रुपये आहे, तर ई-कारवर सबसिडी आता उपलब्ध नाही. या धोरणामध्ये शहरात दर तीन किलोमीटरवर चार्जिंग स्टेशन उभारण्याबाबतही सांगण्यात आले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, जानेवारीपर्यंत 1,022 आणि फेब्रुवारीमध्ये 1,172 ई-रिक्षांची नोंदणी झाली. मार्चमध्ये आतापर्यंत 586 ई-रिक्षांची नोंदणी झाली आहे.

Advertisement

बाब्बो.. इलेक्ट्रिक कार खरेदीवर तब्बल 5 लाख रुपये अनुदान; पहा, कुणी सुरू केलीय ‘ही’ भन्नाट ऑफर..

Advertisement
Advertisement

Leave a Reply