Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून सातत्याने कमी होताहेत सोन्या-चांदीचे भाव; जाणून घ्या, काय आहेत महत्वाची कारणे..?

दिल्ली : जागतिक बाजारात सोन्याचे दर घसरल्याने बुधवारी देशातील मार्केटमध्ये सोन्या चांदीचे दर कमी झाल्याचे दिसून आले. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 144 रुपयांनी घसरला आहे. गेल्या 5 दिवसात सोन्याचा भाव सुमारे चार हजार रुपयांनी कमी झाला आहे. आज सकाळी 9.10 वाजता, 10 ग्रॅम सोन्याचा वायदा भाव 144 रुपयांनी घसरून 51,420 रुपयांवर आला. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. चांदीचा दरही 372 रुपयांनी कमी झाला आहे. चांदीचे भाव 67,953 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. सुमारे महिनाभरात प्रथमच चांदीचे दर 68 हजार रुपयांच्या खाली आले आहेत.

Advertisement

बुधवारी सकाळी जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या स्पॉट किमतीत घसरण झाली. जागतिक बाजारात सोन्याचा भाव $1,923.60 प्रति औंस, तर चांदीचा दर $25.11 प्रति औंस होता. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने असे घडत आहे. गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणुकीकडे लक्ष देणे कमी केले आहे.

Advertisement

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपण्याची शक्यता वाढल्याने जागतिक पातळीवर सोन्या-चांदीत कमजोरी दिसून येत आहे. क्रूडच्या किमती देखील प्रति बॅरल $ 100 च्या आसपास आल्या आहेत, ज्यामुळे जगभरातील शेअर बाजार वेगाने परत येत आहेत आणि गुंतवणूकदार सोन्याऐवजी पुन्हा शेअर मार्केटकडे वळले आहेत. दुसरीकडे, यूएस फेडरल रिजर्व्ह आजपासून सुरू होणाऱ्या बैठकीत व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. या कारणांमुळे सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे.

Advertisement

दरम्यान, गेल्या आठवड्यात देशाचा सोन्याचा साठा मात्र कमी झाला आहे. बँकेच्या आकडेवारीनुसार सोन्याचा साठा 14.7 कोटी डॉलरने कमी होऊन 42.32 अब्ज डॉलरवर आला आहे. सध्या रशिया-युक्रेन संकटाच्या काळात अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना जोरदार झटका बसला आहे. अशा परिस्थिती अर्थव्यवस्थांना आधार देण्याच्या उद्देशाने या देशांनी सोने खरेदीकडे मोर्चा वळवला आहे.

Loading...
Advertisement

त्यामुळे त्यांच्याकडील सोन्याच्या साठ्यात वाढ होत आहे. मात्र, देशाचा सोने साठा घटला आहे. याआधी मात्र सोने साठ्यात सातत्याने वाढ होत होती. सध्याच्या काळात जागतिक बाजारात सोने चांदीच्या किंमती कमी जास्त होत आहेत. रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम होत आहे. त्यामुळे सोन्याचे दर कमी जास्त होत आहेत. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

Advertisement

आहात का तयार.. कारण खिसा खाली होणार..! म्हणून सोने, पेट्रोलसह ‘त्या’ गोष्टींचा महागाई बॉंब फुटणार

Advertisement

Gold Price Today : आज सोन्या-चांदीचे मीटर डाऊन; सोने खरेदीआधी जाणून घ्या नवीन भाव..

Advertisement
Advertisement

Leave a Reply