Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कच्च्या तेलाचे दरात मोठी कपात..! पेट्रोलियम कंपन्यांनी घेतलाय ‘हा’ निर्णय.. वाचा, महत्वाची माहिती..

मुंबई : देशातील प्रमुख तेल कंपन्यांनी बुधवार 16 मार्चसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. देशाच्या इतर महानगरांच्या तुलनेत राजधानी दिल्लीत तेलाच्या किमती कमी आहेत. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होऊन चार महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत मोठी घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 100 डॉलरपर्यंत कमी झाले आहेत.

Advertisement

तेलाच्या किमतीतील शेवटचा बदल 4 नोव्हेंबर 2021 रोजी झाला होता. त्यानंतर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. यावेळी देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर निकाल हाती आले, तर निवडणुकांनंतर देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात होईल, असे तज्ज्ञ सांगत होते. मात्र, निवडणुका संपल्यानंतर आज दहा दिवस उलटून गेले तरीसुद्धा आजपर्यंत राजधानी दिल्लीत पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही किंवा वाढही झालेली नाही.

Advertisement

oilprice.com कडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार, 16 मार्च रोजी WTI क्रूडच्या किंमती $ 96.85 आणि ब्रेंट क्रूडच्या किमती $ 100.5 वर पोहोचल्या आहेत. काही दिवसांआधीच कच्च्या तेलाच्या किमती 140 डॉलर प्रति बॅरलच्या जवळ पोहोचल्या होत्या. मात्र, आता कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. केवळ पेट्रोल आणि डिझेलच नाही तर कच्च्या तेलापासून 2 हजारांहून अधिक वस्तू बनवल्या जातात. होय, कच्च्या तेलाचा वापर कच्चा माल म्हणून दोन हजारांहून अधिक गोष्टी बनवण्यासाठी केला जातो. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण ही जगातील प्रत्येक सामान्य माणसासाठी दिलासा देणारी बातमी आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, आज राष्ट्रीय राजधानी दिल्ली शहरात पेट्रोल 95.45 रुपये प्रति लिटर तर डिझेल 86.71 रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 109.96 रुपये तर डिझेल 94.13 रुपपे, कोलकाता शहरात पेट्रोल 104.65 रुपये तर डिझेल 89.78 रुपये, चेन्नईमध्ये पेट्रोल 101.38 रुपये आणि डिझेल 91.42 रुपये, हैदराबाद मध्ये पेट्रोल 108.18 रुपये तर डिझेल 94.61 रुपये, बंगळुरू शहरात पेट्रोल 100.56 रुपये आणि डिझेल 85 रुपये, लखनऊ शहरात पेट्रोल 95.26 रुपये तर डिझेल 86.8 रुपये प्रति लिटर या दराने मिळत आहे.

Advertisement

पेट्रोलच्या किंमतीबाबत सरकारने दिली महत्वाची माहिती.. जाणून घ्या, तुमच्यासाठीही आहे महत्वाचे..

Advertisement
Advertisement

Leave a Reply