Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

..म्हणून चीन-रशिया अमेरिकेवर भडकले..! चीन पाठोपाठ रशियानेही दिलेय जशास तसे उत्तर; पहा, काय आहे प्रकरण ?

दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धा दरम्यान जगातील उर्वरित महासत्तांमध्ये तणाव वाढत आहे. अलीकडेच, अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की रशियाने चीनकडून आर्थिक आणि लष्करी मदत मागितली आहे. आता याप्रकरणी रशियाचे वक्तव्य आले आहे. रशियाने चीनकडे कधीही लष्करी मदत मागितली नसल्याचे म्हटले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे सचिव दिमित्री पिस्कोव्ह यांनी सांगितले की, युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाकडे पुरेशी लष्करी संसाधने आहेत.

Advertisement

खरे तर, अमेरिकन वेबसाइटने एका अमेरिकी अधिकाऱ्या1च्या हवाल्याने दावा केला होता, की रशियाने चीनकडे लष्करी आणि आर्थिक मदत मागितली आहे. 24 फेब्रुवारी रोजी युक्रेन विरोधात युद्ध घोषित केल्यानंतर रशियाने चीनकडून आर्थिक आणि लष्करी मदत मागितल्याचा दावा अमेरिकन अधिकाऱ्याने केला होता. या प्रकरणी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याचे वक्तव्यही आले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘अमेरिका चीनला लक्ष्य करून विनाकारण खोटी माहिती पसरवत आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईला चीनने थेट विरोध केलेला नाही. तथापि, चीनने रशिया-युक्रेन युद्ध टाळत न आल्याचा आरोपही नाटोवर केला आहे.

Advertisement

दुसरीकडे, रशिया-युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी राजनैतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही बाजूंनी संवाद साधण्याचेही मान्य केले आहे. दुसरीकडे रशिया युक्रेनमधील शहरे आणि विमानतळांवर सातत्याने हमले करत आहे. या युद्धात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत, तर लाखो लोकांना दुसऱ्या देशात आश्रय घेणे भाग पडले आहे. रशियाच्या हमल्यात युक्रेनमधील अनेक शहरे अक्षरशः उद्धवस्त झाली आहेत. इतके नुकसान झाल्यानंतरही युद्ध थांबलेले नाही. बैठकांमधूनही समाधानकारक तोडगा अद्याप निघालेला नाही, त्यामुळे आज 19 दिवसांनंतरही युद्ध सुरूच आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, युक्रेनवरील हमल्यानंतर अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. अमेरिकेने रशियन तेलाच्या आयातीवर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत रशिया आपले कच्चे तेल विकण्यासाठी धडपडत आहे. अशा परिस्थितीत रशियाने आपला मित्र देश भारताबरोबर संपर्क साधला होता. याबाबत भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सरकार रशियाकडून कच्चे तेल आणि इतर वस्तू सवलतीच्या दरात खरेदी करण्याचा विचार करत आहे. दोन भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, रशियाने रुपया-रुबलमध्ये व्यवहार करण्याचे म्हटले आहे.

Advertisement

रशियावर कठोर निर्बंध..! भारत ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; पहा, कसा होणार फायदा..

Advertisement

Russia Ukraine War : अमेरिकेने चीनला दिलीय धमकी..! म्हणाला, रशियाची मदत केली तर..

Advertisement
Advertisement

Leave a Reply