Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IPO Update : आता येणार आणखी दोन कंपन्यांचे आयपीओ; पहा, काय आहे कंपन्यांचे नियोजन..

मुंबई : सध्या शेअर बाजारात आयपीओना अच्छे दिन आले आहेत. अनेक कंपन्यांनी आयपीओ लाँच केले आहेत आणि या आयपीओद्वारे कंपन्या आणि गुंतवणूकदारांनी जबरदस्त कमाई केली आहे. त्यामुळे आणखी काही कंपन्या आयपीओ आणण्याची तयारी करत आहेत. विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी एलआयसीचा आयपीओ लवकरच येणार आहे. तसेच आणखीही काही खासगी कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत.
यामध्ये सध्या दोन कंपन्या आघाडीवर आहेत. वास्तविक, एलआयसीप्रमाणेच आणखी दोन कंपन्यांचे आयपीओ लाँच होणार आहेत. या दोन कंपन्या म्हणजे Rainbow Children’s Medicare Ltd. आणि E-Mudra Ltd.

Advertisement

या दोन्ही कंपन्यांच्या आयपीओला सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) मान्यता दिली आहे. या दोन कंपन्यांनी 9 ते 11 मार्च दरम्यान केलेल्या अर्जांना परवानगी पत्र जारी करण्यात आल्याचे सेबीने म्हटले आहे. या दोन्ही कंपन्यांनी नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये सेबीकडे IPO साठी प्राथमिक कागदपत्रे सादर केली होती.

Advertisement

मसुद्याच्या दस्तऐवजानुसार, रेनबो चिल्ड्रन्स मेडिकेअर 2.4 कोटी इक्विटी शेअर्स (OFS) आणेल, शिवाय 280 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करेल. सूत्रांचे म्हणणे आहे की कंपनी IPO मधून 2,000 कोटी रुपये उभारू शकते. त्याच वेळी, ई-मुद्रा लिमिटेड 200 कोटी रुपयांचे ताजे इक्विटी शेअर्स जारी करण्याव्यतिरिक्त 85.1 लाख शेअर्सच्या विक्रीची ऑफर देखील देईल. कंपनी प्री-आयपीओ प्लेसमेंटमधून 39 कोटी रुपये उभारण्याचा विचार करू शकते. असे घडल्यास नवीन शेअर्सची ऑफर कमी होईल. दोन्ही कंपन्यांचे इक्विटी शेअर्स बीएसई आणि एनएसई स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणीकृत केले जातील.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशात सध्या आयपीओंना अच्छे दिन आहेत. कोरोना काळातही कंपन्या आयपीओच्या माध्यमातून पाहता पाहता कोट्यावधींचा निधी गोळा करत आहेत. गुंतवणूकदारांना सुद्धा फायदा मिळत आहे. आता नव्या वर्षात सुद्धा शेअर बाजारात आयपीओंचा पाऊस पडणार आहे. एक दोन नाही तर तब्बल 45 कंपन्यांचे आयपीओ येणार असल्याची माहिती आहे. या कंपन्यांनी तयारीही सुरू केली आहे. यामध्ये एलआयसी या सर्वात मोठ्या सरकारी विमा कंपनीचाही समावेश आहे. त्यामुळे नव्या वर्षात गुंतवणुकीसाठी अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

Advertisement

‘एलआयसी आयपीओ’बाबत महत्वाची अपडेट, ‘सेबी’ने घेतला मोठा निर्णय…!

Advertisement
Advertisement

Leave a Reply