Take a fresh look at your lifestyle.

Jio Recharge Plan : तीन महिने रिचार्जचे टेन्शन विसरा.. प्लानमध्ये मिळतील ‘हे’ खास फायदे..

मुंबई : देशात दूरसंचार कंपन्यांमध्ये सध्या रिलायन्स जिओ आघाडीवर आहे. अन्य कंपन्यांच्या तुलनेत या कंपनीचे प्लान थोडे जास्त फायदेशीर ठरतात. आज आम्ही तुम्हाला जिओच्या एका खास रिचार्ज प्लानबद्दल सांगणार आहोत. देशातील मोठ्या संख्येने लोक त्यांच्या हा प्लान रिचार्ज करत आहेत. हा Jio च्या सर्वोत्तम रिचार्ज प्लॅनपैकी एक आहे. जर तुम्ही कमी किमतीत चांगला रिचार्ज प्लान शोधत असाल, ज्यामध्ये तुम्हाला इंटरनेट आणि मेसेज सुविधेसह अमर्यादित कॉल मिळेल, तर हा प्लान तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. याशिवाय या प्लानमध्ये तुम्हाला इतर जिओ अॅप सबस्क्रिप्शनही मिळेल. जिओच्या या 395 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनबद्दल सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 84 दिवसांची वैधता मिळत आहे. अशा परिस्थितीत, हा प्लान एकदा रिचार्ज केल्यानंतर, तुम्हाला 3 महिन्यांसाठी रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही. याशिवाय या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉल सुविधाही मिळत आहे. इंटरनेट वापरासाठी, तुम्हाला प्लानमध्ये एकूण 6 GB डेटा मिळत आहे. लक्षात ठेवा की या प्लॅनमध्ये दररोज डेटाची सुविधा नाही. 6 GB इंटरनेट डेटाची वैधता 84 दिवसांसाठी आहे.

Advertisement

याशिवाय प्लॅनमध्ये तुम्हाला 1000 एसएमएस सुविधाही मिळेल. इतर फायद्यांमध्ये, तुम्हाला Jio च्या अॅप जसे की Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे सदस्यत्व देखील मिळत आहे. तुम्ही स्वस्त आणि दीर्घ वैधता रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर तुम्ही Jio चा हा रिचार्ज प्लॅन घेऊ शकता. देशातील मोठ्या संख्येने लोक जिओच्या या प्लानसाठी रिचार्ज करत आहे.

Advertisement

मात्र, यामध्ये एक अडचण आहे. तुम्हाला जर दररोज आणि जास्त प्रमाणात इंटरनेट डेटाची गरज असेल तर हा प्लान तितकासा फायदेशीर नाही. कारण या प्लानमध्ये फक्त 6 जीबी डेटा मिळतो. त्यामुळे हा डेटा फार दिवस चालवता येणार नाही. तुम्हाला डेटासाठी पुन्हा वेगळे रिचार्ज करावे लागेल, त्यामुळे तुमचा खर्चही वाढेल. त्यापेक्षा दररोज दीड ते 2 जीबी किंवा 3 जीबी डेटा देणारे प्लान जास्त फायदेशीर ठरतील.

Advertisement

पैसे नाहीत..! जिओ देत आहे Data Loan; कसे आणि किती मिळणार..? ; जाणून घ्या, महत्वाची माहिती..

Advertisement

भारीच की.. Jio च्या ‘या’ प्लानमध्ये थेट 100 रुपयांचा फायदा; अन्य कंपन्यांच्या प्लान्सला टाकलेय मागे..

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply