Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोलच्या किंमतीबाबत सरकारने दिली महत्वाची माहिती.. जाणून घ्या, तुमच्यासाठीही आहे महत्वाचे..

दिल्ली : देशभरात इंधनाच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. निवडणुकीनंतर पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, अजून तरी तसे काही दिसत नाही. त्यानंतर आता या संदर्भात केंद्र सरकारने महत्वाची माहिती दिली आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभेत पेट्रोलच्या किमतींबाबत माहिती देताना अन्य देशातील इंधनांच्या किंमतीबाबत सांगितले. अमेरिका, कॅनडा, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, स्पेन आणि श्रीलंका या देशांच्या तुलनेत आपल्या देशात पेट्रोलचे दर केवळ 5 टक्क्यांनी वाढले आहेत, असे ते म्हणाले. या सर्व देशांमध्ये या प्रातिनिधिक कालावधीत पेट्रोलच्या किमती 50 ते 58 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतात ती फक्त 5 टक्क्यांनी किंमती वाढल्या आहेत.

Advertisement

ते पुढे म्हणाले, की लोकांना दिलासा देण्याची गरज असल्याचे आमच्या लक्षात आले त्यावेळी पंतप्रधानांनी 5 नोव्हेंबर 2021 रोजी दर कमी केले. आम्ही काही निर्णय घेतले आहेत आणि इतरही काही निर्णय घेण्यास तयार आहोत. मात्र, देशातील 9 राज्यांनी तसे केले नाही. 5 नोव्हेंबर 2021 पासून देशात पेट्रोलचे दर स्थिर आहेत. काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत आहे, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होईल असे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप तसे होताना दिसत नाही.

Loading...
Advertisement

आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीही कमी होताना दिसत आहेत. सोमवारी सुरुवातीच्या व्यापारात तेलाच्या किमती सुमारे $4 प्रति बॅरलने कमी झाल्या. ब्रेंट क्रूड फ्युचर्स $4.12 किंवा 3.6 टक्क्यांनी घसरून $108.55 प्रति बॅरल (0115 GMT) तर क्रूड फ्युचर्स $3.93 किंवा 3.7 टक्क्यांनी कमी होऊन $105.40 प्रति बॅरल होते. याआधी 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर कच्च्या तेलाच्या किमती वेगाने वाढल्या आणि 2008 नंतरच्या सर्वाधिक पातळीवर पोहोचल्या होत्या.

Advertisement

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर.. पहा, पेट्रोलचे भाव वाढले की घटले..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply