Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia Ukraine War : अमेरिकेने चीनला दिलीय धमकी..! म्हणाला, रशियाची मदत केली तर..

दिल्ली : युक्रेनविरोधात सुरू असलेल्या युद्धा दरम्यान रशिया आर्थिक निर्बंधांनी हैराण झाला आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी रशियाने आपला जुना मित्र भारताकडे थेट मदत मागितली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे की, भारताने मॉस्को तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील गुंतवणुकीत वाढ करावी, असे आवाहन रशियाने केले होते. त्यानंतर आता रशियाने चीनकडेही मदत मागितल्याचे समोर येत आहे. रशियाच्या या नव्या हालचालींनी अमेरिका मात्र चांगलाच अस्वस्थ झाला आहे. त्याने तर थेट चीनला धमकीच दिली आहे. अमेरिकेने म्हटले आहे, की जर रशियाला मदत केली तर चीनवर कठोर कारवाई करण्यात येईल.

Advertisement

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा मार्गदर्शक जॅक सुलिव्हन यांनी म्हटले आहे, की रशिया युक्रेनवर आक्रमण करणार हे चीनला आधीच माहित होते. अमेरिकेची चीनवरही बारीक नजर आहे. चीन रशियाला कोणत्या वस्तू देतो, आर्थिक सहकार्य किती प्रमाणात करतो यावरही अमेरिक लक्ष ठेऊन आहे. चीनने रशियाची नुकसान भरपाई करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका शांत बसणार नाही, असा इशारा चीनला दिला आहे. या प्रकरणी चीनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या संदर्भात चीन आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याची माहिती आहे.

Advertisement

दरम्यान, 1991 मध्ये सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर रशियाची अर्थव्यवस्था सध्या अत्यंत मोठ्या संकटाचा सामना करत आहे कारण पाश्चात्य देशांनी युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. काही पाश्चात्य देशांनी भारताला युक्रेनमधील रशियन कारवायांचा निषेध करण्यास सांगितले आहे परंतु भारताने आतापर्यंत रशियाविरुद्ध कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भारताने या मुद्द्यावर तटस्थ धोरण स्वीकारले आहे. चीननेही याच पद्धतीचे धोरण घेतले आहे. आशियातील वेगाने विकसित होणाऱ्या दोन मोठ्या देशांनी असे धोरण घेतल्याने पाश्चिमात्य देश अस्वस्थ झाले आहेत.

Loading...
Advertisement

रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक यांनी म्हटले होते की, रशियाची भारतातील तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात 1 अब्ज डॉलरच्या जवळपास पोहोचली आहे आणि ही संख्या वाढण्याची आणखी संधी आहे. नोवाक यांनी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्र्यांना सांगितले की, आम्हाला रशियन तेल आणि वायू क्षेत्रात भारतीय गुंतवणूक अधिक आकर्षित करण्यात आणि भारतात रशियन कंपन्यांचे विक्री नेटवर्क वाढ करण्याची आवश्यकता वाटते.

Advertisement

अमेरिकेने या आठवड्यात रशियन तेल आयातीवर निर्बंध लादले आहेत आणि ब्रिटनने सांगितले आहे की ते वर्षाच्या अखेरीस टप्प्याटप्प्याने निर्बंध टाकतील. कच्च्या तेलाचा दुसरा सर्वात मोठा निर्यातदार रशिया असल्याने, अशा परिस्थितीत पाश्चात्य देशांच्या निर्णयांमुळे जागतिक ऊर्जा बाजार आणखी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. भारताद्वारे संचालित कंपन्यांकडे रशियन तेल आणि वायू क्षेत्रात हिस्सा आहे, तर Rosneft सह रशियन कंपन्यांचा भारतीय रिफायनर नायरा एनर्जीमध्ये मोठी हिस्सेदारी आहे. काही भारतीय कंपन्याही रशियन तेल खरेदी करतात.

Advertisement

Russia-Ukraine War : रशिया निर्बंधांमुळे होणार मोठे नुकसान; पहा, चीनने कुणाला दिलाय ‘हा’ इशारा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply