Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर.. पहा, पेट्रोलचे भाव वाढले की घटले..?

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel Price) नवे दर जाहीर केले. आजही महानगरांमध्ये तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये चार महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल-डिझेलच्या दरात सरकारी तेल कंपन्यांनी कोणताही बदल केलेला नाही. असे असतानाही मुंबईतील सर्वात खर्चिक पेट्रोल आजही 110 रुपयांच्या आसपास मिळत जात आहे. सोमवारीही किमती स्थिर राहिल्या, पण अनेक लहान शहरे आणि राज्यांच्या राजधानीत पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले आहेत.

Advertisement

दिल्लीमध्ये पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर, मुंबईमध्ये पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर, चेन्नईमध्ये पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर आणि कोलकाता शहरात पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर या दराने मिळत आहे. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.

Advertisement

मात्र, नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या उत्तर प्रदेशातील काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी झाले आहेत. येथे गुरुग्राममध्ये पेट्रोल 95.90 रुपये आणि डिझेल 87.11 रुपये प्रति लिटर झाले आहे. लखनऊमध्ये पेट्रोल 95.27 रुपये आणि डिझेल 86.79 रुपये प्रति लिटर झाले आहे. तर राजस्थान राज्यातील जयपूर शहरात पेट्रोल 107.11 रुपये आणि डिझेल 90.74 रुपये प्रति लिटर झाले आहे.

Loading...
Advertisement

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. त्यानंतर तत्काळ या बदललेल्या दरांनुसार अंमलबजावणी सुरू होते. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

Advertisement

Petrol Diesel Price : देशात इंधनाच्या नव्या किंमती जाहीर.. पहा, मोठ्या शहरात काय आहे पेट्रोल-डिझेलचा भाव..

Advertisement
Advertisement

Leave a Reply