Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आर्थिक निर्बंधांनी केले हैराण..! अखेर रशियाने भारताकडे मदत मागितलीच.. पहा, काय केलेय आवाहन..?

दिल्ली : युक्रेनविरोधात सुरू असलेल्या युद्धा दरम्यान रशिया आर्थिक निर्बंधांनी हैराण झाला आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी रशियाने आपला जुना मित्र भारताकडे थेट मदत मागितली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे की, भारताने मॉस्को तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील गुंतवणुकीत वाढ करावी, असे आवाहन रशियाने केले आहे. आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारतात रशियन कंपन्यांच्या विक्रीचे जाळे विस्तारण्यास रशिया उत्सुक आहे.

Advertisement

1991 मध्ये सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर रशियाची अर्थव्यवस्था सध्या अत्यंत मोठ्या संकटाचा सामना करत आहे कारण पाश्चात्य देशांनी युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. काही पाश्चात्य देशांनी भारताला युक्रेनमधील रशियन कारवायांचा निषेध करण्यास सांगितले आहे परंतु भारताने आतापर्यंत रशियाविरुद्ध कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भारताने या मुद्द्यावर तटस्थ धोरण स्वीकारले आहे.

Advertisement

रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक यांनी म्हटले आहे की, रशियाची भारतातील तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात 1 अब्ज डॉलरच्या जवळपास पोहोचली आहे आणि ही संख्या वाढण्याची आणखी संधी आहे. नोवाक यांनी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्र्यांना सांगितले की, आम्हाला रशियन तेल आणि वायू क्षेत्रात भारतीय गुंतवणूक अधिक आकर्षित करण्यात आणि भारतात रशियन कंपन्यांचे विक्री नेटवर्क वाढ करण्याची आवश्यकता वाटते.

Loading...
Advertisement

अमेरिकेने या आठवड्यात रशियन तेल आयातीवर निर्बंध लादले आहेत आणि ब्रिटनने सांगितले आहे की ते वर्षाच्या अखेरीस टप्प्याटप्प्याने निर्बंध टाकतील. कच्च्या तेलाचा दुसरा सर्वात मोठा निर्यातदार रशिया असल्याने, अशा परिस्थितीत पाश्चात्य देशांच्या निर्णयांमुळे जागतिक ऊर्जा बाजार आणखी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. भारताद्वारे संचालित कंपन्यांकडे रशियन तेल आणि वायू क्षेत्रात हिस्सा आहे, तर Rosneft सह रशियन कंपन्यांचा भारतीय रिफायनर नायरा एनर्जीमध्ये मोठी हिस्सेदारी आहे. काही भारतीय कंपन्याही रशियन तेल खरेदी करतात.

Advertisement

Russia Ukraine War : अमेरिकेचा आणखी एक झटका..! रशियाचा ‘तो’ महत्वाचा अधिकार काढून घेतला

Advertisement
Advertisement

Leave a Reply