Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

युद्धाच्या संकटात भारतासाठी खुशखबर..! ‘त्या’ देशाकडून मिळू शकतात ‘इतके’ पैसे; पहा, काय आहे नेमके कारण..

दिल्ली : रशिया-युक्रेन युद्ध आणि पाश्चिमात्य देशांनी रशियावर टाकलेले निर्बंध यादरम्यान भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात जाहीर करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे भारतीय सरकारी कंपनीचे काही पैसे दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएलामध्ये अडकले होते, जे आता परत मिळू शकतात. यावेळी संपूर्ण जगाचे लक्ष रशियाकडे आहे, रशियाने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हमला केला होता. तेव्हापासून त्याच्यावर सर्व प्रकारचे निर्बंध टाकले जात आहेत. तर अमेरिका इतर देशांवर टाकलेले हे निर्बंध शिथिल करण्याचा विचार करत आहे.

Advertisement

रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांदरम्यान, भारताने अमेरिकेबरोबर राजनैतिक चर्चा वेगाने सुरू केली आहे. जेणेकरून व्हेनेझुएलामधील आपल्या कंपनीची थकबाकी वसूल करता येईल. भारतातील दुसरी सर्वात मोठी तेल आणि वायू कंपनी ओएनजीसी विदेशचे सीईओ म्हणाले की, भारत या मुद्द्यावर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाशी चर्चा करत आहे. कंपनीला व्हेनेझुएलाच्या तेल मालवाहू व्यापारातील मागील कर्जाची पुर्तता करण्यास परवानगी देणे. व्हेनेझुएलावर अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे हा पैसा अडकला आहे.

Advertisement

सूत्रांचे म्हणणे आहे, की अमेरिका आता ते निर्बंध शिथिल करू शकते, जेणेकरून ONGC ची विदेशी शाखा OVL ची $420 दशलक्ष डॉलर परत मिळवू शकेल. जे काही वर्षांपासून अडकले आहेत. 8 मार्च रोजी, बायडेन प्रशासनाने रशियन तेल, वायू आणि कोळसा आयातीवर बंदी घातली. अशा स्थितीत अमेरिका रशियाला विसरून या सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएलाकडून मदत घेऊ शकतो, असे आता मानले जात आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलावर निर्बंध टाकल्यापासून तिथून होणारी आयात बंद झाली आहे. या निर्बंधांमुळे भारताने 2019 मध्ये व्हेनेझुएलाकडून तेल आयात मोठ्या प्रमाणात कमी केली. इराणकडून तेल खरेदी करणेही बंद केले.

Advertisement

व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथे अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तेथील अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. ही बैठक दोन तास चालली. मात्र, यामध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष यांना राष्ट्राध्यक्ष पदावरुन दूर करण्यासाठी अमेरिकेने या देशावर सर्व निर्बंध टाकले होते, ज्यात या देशाला अमेरिकेच्या बाजारात कच्च्या तेलाचा व्यापार करण्यापासून रोखण्याचा समावेश होता. व्हेनेझुएलाचा 96 टक्के महसूल तेल व्यापारातून येतो. अमेरिकेने देखील सरकारबरोबर वाटाघाटी करण्यात स्वारस्य दाखवले नाही आणि विरोधी पक्षनेते जुआन गुएडो यांना देशाचे कायदेशीर अध्यक्ष म्हणून घोषित केले, अमेरिका त्यांना नेता म्हणून मान्यता देणाऱ्या 60 देशांपैकी एक आहे.

Loading...
Advertisement

भारताबद्दल सांगितले तर हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार आणि ग्राहक देश आहे. फक्त एकाच देशाकडून नाही तर इतर देशांकडूनही तेल घ्यायचे आहे, जेणेकरून त्याचे आयात देयक कमी होईल आणि परकीय चलनात बचत करण्यासाठी स्वस्त तेल खरेदी करू शकेल. इराण आणि व्हेनेझुएलावर लादलेल्या निर्बंधांमुळे 3 दशलक्ष बॅरल प्रतिदिन किंवा जागतिक पुरवठ्याच्या 3 टक्के तेल अवरोधित केले आहे.

Advertisement

दरम्यान, भारताने आता अमेरिकेच्या माध्यमातून थकबूल देण्याची मागणी व्हेनेझुएलाकडे केली आहे. परराष्ट्र विभाग आणि अमेरिकेतील भारतीय दूतावास या मुद्द्यावर चर्चा करत आहेत. व्हेनेझुएलाकडून कोणत्याही प्रकारचा थकबाकीदार पैसा घेण्यासाठी अमेरिकेची मान्यता अत्यंत महत्त्वाची आहे. आता अमेरिका हे किती काळ मान्य करते आणि भारताला पैसे परत मिळतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

Russia Ukraine War : रशिया विरोधात अमेरिकेचा नवा प्लान तयार; पहा, आता अमेरिका काय करणार..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply