Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

युद्धाचा इफेक्ट..! खाद्यतेलामुळे बिघडले खर्चाचे गणित; पहा, पंधरा दिवसात किती वाढलेत भाव..

मुंबई : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता भारतीय बाजारांवरही दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्याचा परिणाम थेट दिसून येत आहे. गेल्या दोन आठवड्यात देशात खाद्यतेलाच्या किमती 15-25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. भारत रशिया आणि युक्रेनमधून 90 टक्क्यांहून अधिक सूर्यफूल तेल आयात करतो. आज या तेलाच्या किंमती वेगाने वाढताना दिसत आहेत. मात्र, सध्या मोहरी तेलाचे दर कमी झाले आहेत. सतत वाढत असलेल्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सध्या बाजारात तेजी पाहायला मिळत आहे, तर होळीमुळे खाद्यतेलाच्या भावात वाढ  होत असून, पुढील एक-दोन महिने अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Advertisement

देशात गेल्या दोन आठवड्यांपासून घाऊक बाजारात पामोलिनचा भाव 130 रुपयांवरून 157 रुपये, कच्च्या पाम तेलाचा भाव 128 रुपयांवरून 162 रुपये प्रतिकिलो झाला आहे. देशी तेलांमध्ये सोयाबीन रिफाइंड 131 रुपयांवरून 160 रुपये, सूर्यफूल तेल 130 रुपयांवरून 165 रुपये, शेंगदाणा तेलाचा भाव 135 रुपयांवरून 157 रुपये प्रतिकिलो झाला आहे. तर मोहरीच्या तेलाचे दर 165 रुपयांवरून 152 रुपये किलोवर आले आहेत.

Advertisement

दिल्ली खाद्यतेल असोसिएशनच्या मते, देश खाद्यतेलाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे मुख्य खाद्यतेल उत्पादक देश मलेशिया आणि इंडोनेशिया यांनी तेलाच्या किमती वाढ केल्या आहेत. युक्रेनमधून देशाला होणारा सूर्यफूल तेलाचा पुरवठा युद्धामुळे थांबला आहे. देशातील 80 टक्क्यांहून अधिक म्हणजेच सुमारे दोन लाख टन सूर्यफूल तेल युक्रेनमधून दर महिन्याला येते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम देशांतर्गत तेलाच्या किमतीवरही झाला आहे. दोन आठवड्यात देशी तेलाच्या दरात किलोमागे 20 ते 30 रुपयांनी वाढ झाली आहे.

Advertisement

युद्धामुळे बहुतांश खाद्यतेलाच्या किंमती वाढल्याचे खाद्यतेलाचे व्यापारी सांगतात. तेल उद्योगानुसार यंदा 115-120 लाख टन मोहरीचे उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या वर्षी 85 ते 90 लाख टन मोहरीचे उत्पादन झाले होते. मात्र, सरकारी अंदाजानुसार यंदा मोहरीचे उत्पादन सुमारे 115 लाख टन असेल, तर गतवर्षात सुमारे 102 लाख टन मोहरीचे उत्पादन झाले होते. सध्या खाद्यतेलाच्या महागाईत फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याचे खाद्यतेल व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Loading...
Advertisement

खरं तर, भारत दरवर्षी 25 लाख टन सूर्यफूल तेल आयात करतो. त्यापैकी 90 टक्के रशिया आणि युक्रेनमधून येतात. कारण हे दोन्ही देश तेलाचे मोठे आयातदार आहेत. पाम आणि सोयाबीन तेलानंतर, सूर्यफूल तेल हे देशातील तिसरे खाद्यतेल आहे जे मोठ्या प्रमाणावर आयात केले जाते.

Advertisement

सध्या युक्रेनमधील बंदरे बंद आहेत आणि जहाजांची वाहतूक पूर्णपणे बंद आहे. रशिया आणि युक्रेनमधील लढाई अशीच सुरू राहिल्यास मार्चअखेर सूर्यफूल तेलाची उपलब्धता कमी होऊ शकते. सध्या देशात मार्च-एप्रिलच्या मध्यापर्यंत सूर्यफूल तेलाचा पुरेसा साठा आहे. मात्र या दोघांमध्ये परिस्थिती सुधारली नाही, तर ग्राहक सोयाबीनसह अन्य पर्यायी तेल वापरू शकतात. त्यामुळे त्यांच्या दरातही वाढ होईल. खाद्यतेलाच्या किमतीत गुरुवारपासून काही प्रमाणात घट झाली असून येत्या आठवडाभरात ही स्थिती सुधारेल असा अंदाज आहे. मात्र परिस्थिती पूर्वपदावर न आल्यास केंद्राला पुन्हा एकदा शुल्कात कपात करावी लागू शकते.

Advertisement

खाद्यतेलांचे टेन्शन घेऊ नका..! पहा, ‘त्यांच्या’ कडून सरकारला काय मिळालयं आश्वासन..?

Advertisement

खाद्यतेलांच्या किंमती कमी करण्यासाठी सरकारचा आणखी एक प्लान; पहा, ‘कसा’ वाढणार पाम तेलाचा पुरवठा..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply