Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून इतके दिवस बँका राहणार बंद; पहा, कोणत्या दिवशी कुठे राहतील बँका बंद..

मुंबई : तुम्ही पुढील आठवड्यात बँक संबंधित कामकाजाचे नियोजन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. पुढील आठवड्यात होळी सणानिमित्त देशभरात अनेक ठिकाणी बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे कोणत्या दिवशी बँकांना सुट्टी आहे, याची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला याबाबत माहिती नसेल तर काळजी करू नका, आम्ही तुम्हाला बँकांना कोणत्या दिवशी सुट्टी राहणार आहे, याबाबत माहिती देणार आहोत. चला तर मग, जाणून घेऊ या, कधी आणि कोणत्या राज्यात बँका बंद राहतील याची माहिती घेऊ या..

Advertisement

पुढील आठवड्यात होळीचा सण येत आहे, अशा परिस्थितीत सलग चार दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही. 17, 18, 19 आणि 20 मार्चला सलग 4 दिवस बँका बंद राहतील. या सुट्यांमध्ये रविवारच्या सुट्टीचाही समावेश आहे.

Advertisement

रिजर्व्ह बँकेच्या (Bank Holidays List 2022) अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, बँकिंग सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमधील विशेष प्रसंगी सूचनांवर देखील अवलंबून असतात. या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. अशा स्थितीत मार्च महिन्यात बँकांचे कामकाज सुरळीत करण्यासाठी घराबाहेर पडण्याआधी बँकांच्या सुट्ट्यांची यादी लक्षात घ्या, नाहीतर तुम्हाला विनाकारण त्रास सहन करावा लागेल.

Loading...
Advertisement

17 मार्च रोजी डेहराडून, कानपूर, लखनऊ आणि रांचीमध्ये बँका बंद राहतील. 18 मार्च रोजी बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, इंफाळ, कोलकाता आणि तिरुवनंतपुरम वगळता अन्य ठिकाणी बँका बंद राहतील. 19 मार्च रोजी भुवनेश्वर, इंफाळ आणि पाटणामध्ये बँका बंद राहतील. तसेच 20 मार्च रोजी साप्ताहिक सुट्टी असल्याने या दिवशी देशभरातील बँका बंद राहतील.

Advertisement

मार्च महिन्यात तब्बल ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद; पहा, कोणत्या दिवशी कुठे राहतील बँका बंद..?

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply