Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia Ukraine War : रशिया विरोधात ब्रिटेनची मोठी कारवाई..! रशियातील ‘त्या’ खासदारांना नो एन्ट्री; जाणून घ्या..

दिल्ली : रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) अजूनही सुरुच आहे. आज युद्धाचा 17 वा दिवस आहे, तरीही युक्रेनने माघार घेतलेली नाही. त्यामुळे तीन दिवसात युक्रेनचा पराभव करण्याचा रशियाचा अंदाज सपशेल अपयशी ठरला आहे. युद्ध जसजसे वाढत आहे तसे रशियावर आधिकाधिक निर्बंध येत आहेत. निर्बंध जाहीर करण्यात अमेरिका आणि ब्रिटेन आघाडीवर आहे. आताही ब्रिटेनने रशियाला जोरदार झटका दिला आहे. यावेळी ब्रिटेन सरकारने रशियन संसदेचे कनिष्ठ सभागृह ड्यूमाच्या 386 सदस्यांवर निर्बंध जाहीर केले आहेत. ड्यूमाच्या या सर्व सदस्यांनी युक्रेनच्या लुहान्स्क आणि डोनेस्तक प्रांतांना रशियाने स्वतंत्र प्रजासत्ताक म्हणून मान्यता देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Advertisement

ब्रिटनच्या फॉरेन, कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट ऑफिस (FCDO) ने शुक्रवारी निर्बंध जाहीर केले आणि म्हटले की ते रशियन खासदारांना ब्रिटनमध्ये प्रवास करण्यास, मालमत्ता वापरण्यास आणि ब्रिटनमध्ये व्यापार करण्यास प्रतिबंधित करेल. ब्रिटनचे परराष्ट्र सचिव लिझ ट्रस म्हणाले, की “आम्ही पुतिनच्या युक्रेनवर बेकायदेशीर आक्रमणात सहभागी असलेल्यांना आणि या घातक युद्धाला पाठिंबा देणार्‍यांना लक्ष्य करत आहोत.” आम्ही रशियावर दबाव टाकणे थांबवणार नाही आणि निर्बंधांद्वारे रशियन अर्थव्यवस्थेला रोखत राहू. ब्रिटन आणि त्यांचे मित्र राष्ट्र युक्रेनच्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे ते म्हणाले. रशियाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पाडण्यासाठी ब्रिटन युक्रेनला मानवतावादी मदत, संरक्षणात्मक शस्त्रे आणि मुत्सद्दी कार्यासाठी पाठिंबा देत राहील.

Advertisement

दरम्यान, याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही एक महत्वाचे वक्तव्य केले होते. ते म्हणाले होती, की रशिया आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँक यांसारख्या वित्तीय संस्थांकडून निधीची मागणी करणार नाही याची खात्री करण्यासाठी G7 नेते सहमत होतील. तसेच त्यांनी रशियावर नवीन निर्बंध लादण्याची घोषणा केली होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे आक्रमक असून त्यांना या कृत्याची किंमत द्यावी लागेल, असे अमेरिकेचे बायडेन यांनी म्हटले होते.

Advertisement

अमेरिका रशियाकडून मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेईल, अशी घोषणा अमेरिकेच्या सभागृहाच्या अध्यक्षांनी आज पत्रकार परिषदेत केली. मे महिन्याच्या अखेरीस आम्ही 2027 पर्यंत रशियन गॅस, तेल आणि कोळशावरील आमचे अवलंबित्व संपुष्टात आणण्याचा प्रस्ताव सादर करू, असे युरोपीय आयोगाच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.

Loading...
Advertisement

Russia Ukraine War : रशिया विरोधात अमेरिकेचा नवा प्लान तयार; पहा, आता अमेरिका काय करणार..?

Advertisement

Russia-Ukraine War : रशिया निर्बंधांमुळे होणार मोठे नुकसान; पहा, चीनने कुणाला दिलाय ‘हा’ इशारा..

Advertisement

Russia Ukraine War : रशिया विरोधात नवा प्लान; पहा, आता काय करणार युरोपातील देश..

Advertisement
Advertisement

Leave a Reply