Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia Ukraine War : रशिया विरोधात नवा प्लान; पहा, आता काय करणार युरोपातील देश..

दिल्ली : युक्रेन आणि रशियन सैन्यामध्ये युद्ध सुरू होऊन 16 दिवस झाले आहेत. युक्रेनची राजधानी कीवमध्ये रशियन सैन्याने निर्णायक युद्ध सुरू केले आहे. दरम्यान, युरोपियन युनियनच्या नेत्यांनी शुक्रवारी सांगितले की ते कीवसाठी लष्करी समर्थन वाढ करताना, युक्रेनवरील आक्रमणासाठी रशियाला शिक्षा करण्यासाठी आणखी निर्बंध टाकले जातील. दुसरीकडे, रशियाने लवकरच UNAC बैठक घेण्याची मागणी केली आहे.

Advertisement

युरोपियन युनियनचे वरिष्ठ राजनयिक जोसेप बोरेल म्हणाले, की पॅरिसच्या बाहेर दोन दिवसीय शिखर परिषदेत सहभागी झालेल्या 27 अधिकाऱ्यांनी युक्रेनला लष्करी मदतीसाठी अतिरिक्त 500 दशलक्ष युरो गुंतवणूक करण्यास सहमती दर्शविली आहे. याआधी शुक्रवारी रशियाने युक्रेनच्या पश्चिमेकडील विमानतळांजवळ प्रथमच हमला केला आणि राजधानी कीववर दबाव कायम ठेवला. ते म्हणाले की, “मी रशियाने युक्रेनवर हमला केल्याच्या विरोधात माझा प्रस्ताव ठेवला आहे. आम्ही हेच करणार आहोत आणि मला खात्री आहे की इतर EU नेते याला मान्यता देतील. लवकरच आम्ही रशियावर आणखी कठोर निर्बंध टाकू. ”

Advertisement

रशियाने UNAC बैठक लवकर घेण्याची मागणी केली आहे. युक्रेनच्या जमिनीवर आपल्या सैन्याविरुद्ध जैविक शस्त्रे वापरली जाऊ शकतात असा रशियाचा आरोप आहे. अलीकडच्या काही दिवसांत, रशियाच्या गुप्तचर विभागाने दावा केला आहे की त्यांच्या सैन्याने युक्रेनच्या अनेक भागात जैविक शस्त्रांचे संशोधन उघड केले आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, रशियाने नाटोवरच घणाघाती टीका केली आहे. तसेच नाटोचा खरा प्लान काय आहे, हे सुद्धा उघड केले आहे. नाटोचा खरा उद्देश आम्हाला रोखणे हा आहे, असे रशियाने म्हटले आहे. त्याचवेळी आम्ही नाटोला जोरदार प्रत्युत्तर देऊ, असा इशारा रशियन सरकारने दिला आहे. एका अहवालानुसार, रशियाने दावा केला आहे की, पूर्वेकडील भागात नाटो सैन्य जमा होत आहे. त्याचवेळी रशियाने नाटोच्या या हालचालीचे वर्णन चिथावणीखोर असल्याचे केले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी स्पष्टपणे युक्रेन यापुढे नाटो सदस्यत्वाची मागणी करणार नाही, असे सांगितल्यानंतर रशियाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

चीनने ऐनवेळी दिला मदतीस नकार; रशियाला आता भारताचाच आधार; पहा, आता भारत काय करणार..?

Advertisement

रशिया-युक्रेन युद्धामुळे अमेरिकेची चांदी..! पहा, ‘त्याद्वारे’ कशी करतोय अब्जावधींची कमाई..

Advertisement
Advertisement

Leave a Reply