Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

फेब्रुवारी महिन्यात कार-दुचाकी कंपन्यांना झटका; ‘त्या’ कारणांमुळे घटलीय वाहनांची विक्री..

मुंबई : देशातील सेमी कंडक्टरच्या कमतरतेमुळे ऑटोमोबाइल क्षेत्र आधीच अडचणीत आहे. त्यानंतर रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे हे संकट आणखी वाढले आहे. आता त्याचा परिणाम दिसून येत आहे. सियामच्या अहवालानुसार, फेब्रुवारी महिना वाहन उद्योगासाठी वाईट ठरला आहे. प्रवासी वाहनांच्या विक्रीत सहा टक्क्यांनी घट झाली असली तरी या काळात दुचाकींच्या विक्रीत तब्बल 27 टक्क्यांनी घट झाली आहे.

Advertisement

ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन सियामच्या अहवालानुसार, कारखान्यांकडून डीलर्सना वाहनांचा पुरवठा फेब्रुवारी 2022 मध्ये 23 टक्क्यांनी घटला आहे. त्यात म्हटले आहे की, प्रवासी वाहने, दुचाकी आणि तीन चाकी वाहनांची एकूण घाऊक विक्री फेब्रुवारी 2022 मध्ये 13,28,027 युनिट्सवर होती, जी मागील वर्षाच्या याच कालावधीतील 17,35,909 युनिट्सच्या तुलनेत 23 टक्क्यांनी घसरली आहे. अहवालानुसार, फेब्रुवारीमध्ये वाहनांच्या एकूण विक्रीत 17.8 टक्क्यांची घट झाली आहे. या महिन्यात एकूण 17.91 लाख वाहनांची विक्री झाली. तर फेब्रुवारी 2021 मध्ये एकूण 21.77 लाख वाहनांची विक्री झाली.

Advertisement

प्रवासी वाहनांची एकूण विक्री फेब्रुवारी 2022 मध्ये सहा टक्क्यांनी घसरून 2,62,984 युनिट्सवर आली आहे, जी मागील वर्षात याच कालावधीत 2,81,380 युनिट्स होती. पॅसेंजर कारच्या घाऊक विक्रीबद्दल सांगितले तर, गेल्या महिन्यात फेब्रुवारी 2021 मध्ये 1,55,128 युनिट्सच्या तुलनेत 1,33,572 युनिट्स होती. दरम्यान, दुचाकींच्या विक्रीच्या बाबतीत, त्यांची घाऊक विक्री गेल्या महिन्यात 27 टक्क्यांनी घसरून 10,37,994 युनिट्सवर आली आहे, जी मागील वर्षी 14,26,865 युनिट्स होती. त्याचप्रमाणे तीन चाकी वाहनांची घाऊक विक्री गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 27,656 वरून 27,039 युनिट्सपर्यंत कमी झाली.

Loading...
Advertisement

सियामचे महासंचालक राजेश मेनन म्हणाले की, सेमी कंडक्टरच्या टंचाई संबंधित अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे, नवीन नियमांमुळे खर्च वाढला आहे. वाहन उद्योगातील विक्रीवर परिणाम करणारे हे एक प्रमुख कारण आहे. गेल्या महिन्यात सर्व श्रेणीतील वाहनांच्या उत्पादनात 20 टक्क्यांची घट झाली आहे. मेनन म्हणाले की, ऑटो कंपन्या सध्या रशिया-युक्रेन संघर्षाच्या संभाव्य परिणामावर लक्ष ठेवून आहे, कारण युद्ध वाढल्यास जागतिक पुरवठा साखळी आणखी विस्कळीत होण्याचा धोका आहे.

Advertisement

फेब्रुवारीमध्ये वाहन कंपन्यांनी मिळालयं मोठं टेन्शन; ‘या’ सहा कंपन्यांना बसलाय जोरदार झटका..

Advertisement
Advertisement

Leave a Reply