Maharashtra Budget Live : सर्वसामान्यांना दिलासा..! CNG बाबत राज्य सरकारने घेतलाय ‘हा’ मोठा निर्णय..
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत राज्याचा 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात सुरुवातीलाच अर्थमंत्री पवार यांनी राज्यातील उद्योगाबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यातील उद्योगांसाठी विशेष सवलत देणार आणि इनोव्हेशन हब उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. होतकरू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी मुंबई, नाशिक आणि नागपूरमध्ये नॅनो, ड्रोन तंत्रज्ञानासाठी प्रत्येक महसूल विभागात एक इनोव्हेशन हब उभारण्यात येणार आहे. तसेच संदेशवहन उपग्रह, ड्रोन टेक्नोलॉजी जागतिक तंत्रज्ञानाच्या जमान्यात इनोव्हेशन हब सुरू करण्यात येणार आहे.
शालेय शिक्षण विभागासाठी 2 हजार 354 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागासाठी 11 हजार 199 कोटी रुपये तरतूद केली आहे. नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी आता 75 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. कृषी संशोधनासाठी आधिकचा निधी शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असे पवार यांनी सांगितले.
काही दिवसांपासून इंधनाच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात करुन काही दिलासा दिला होता. मात्र, राज्य सरकारने तसा कोणताच निर्णय घेतला नाही. व्हॅट सुद्धा कमी केला नाही. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात इंधनासाठी जास्त पैसे द्यावे लागत आहेत. यानंतर आजच्या अर्थसंकल्पात या दरवाढीतून काहीसा दिलासा मिळेल, असे सांगण्यात येत होते. मात्र, सरकारने तसा कोणताही निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही.
मात्र, नैसर्गिक वायू वापरात वाढ होण्यासाठी घरगुती पाइप गॅस, सीएनजीवर चालणारी वाहनांचा वापर वाढावा, यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने मूल्यवर्धित कराचा दर 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्के इतका केला आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत अंदाजे 800 कोटी रुपये घट होणार आहे. या घोषणेमुळे राज्यात CNG आणि PNG गॅस स्वस्त होणार आहे.
तेल-डाळीने बिघडले घराचे बजेट..! देशभरात महागाईने दिलाय जोरदार झटका; पहा, काय आहेत भाव..?
Maharashtra Budget 2022 : राज्यातील उद्योगासाठी सरकारची मोठी घोषणा; पहा, काय मिळणार..?