Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रशिया-युक्रेन युद्धामुळे अमेरिकेची चांदी..! पहा, ‘त्याद्वारे’ कशी करतोय अब्जावधींची कमाई..

रशिया आणि युक्रेन युद्ध अजूनही सुरुच आहे. या युद्धात युक्रेनचे अतोनात नुकसान झाले आहे. मदत करण्याचे आश्वासन देऊनही ऐनवेळी अमेरिका आणि युरोपिय देशांनी युक्रेनला लष्करी मदत नाकारली. तरी देखील आज 15 दिवसांपासून युक्रेन रशिया विरोधात संघर्ष करत आहे. या देशांनी युक्रेनला थेट लष्करी मदत दिली नसली तरी आर्थिक स्वरुपात हे देश युक्रेनला मोठी मदत करत आहेत. जागतिक संस्थाही मदत करत आहेत. आता अमेरिकेने युक्रेनला तब्बल 13.6 अब्ज डॉलर्स मदत देण्याची घोषणा केली आहे. हे जरी खरे असले तरी आणखी एक अहवाल आला आहे. त्यामध्ये म्हटले आहे, की या युद्धामुळे अमेरिका अब्जावधींची कमाई करत आहे.

Advertisement

अमेरिकी कंपन्या शस्त्रांचा पुरवठा करुन अब्जावधी डॉलर्सची कमाई करत आहे. तसेच चीनलाही या युद्धामुळे मोठा फायदा होत आहे. एशिया टाइम्सच्या रिपोर्टनुसार, संरक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. युरोपियन युनियनने 45 कोटी युरो किंमतीची शस्त्र खरेदी करुन युक्रेनला देणार असल्याचे म्हटले आहे. तर अमेरिकेनेही अब्जावधी डॉलर आर्थिक मदत देणार असल्याचे म्हटले आहे. याआधी अमेरिकेने युक्रेनला 65 कोटी डॉलरची सैन्य मदत दिली होती. अमेरिका आणि नाटो देशांनी युक्रेनला मोठा शस्त्रसाठा दिला आहे.

Advertisement

या युद्धजन्य परिस्थितीमुळे शस्त्रे तयार करणाऱ्या कंपन्यांची मात्र चांदी झाली आहे. शस्त्र उद्योगात अमेरिका जगात पहिल्या क्रमांकावर आहे. 2016 ते 2020 या काळात जगात एकूण विक्री झालेल्या शस्त्रांपैकी 37 टक्के शस्त्र विक्री अमेरिकन कंपन्यांनी केली आहे. या व्यतिरिक्त रशिया 20 टक्के, फ्रान्स 8 टक्के, जर्मनी 6 टक्के आणि चीन 5 टक्के इतके प्रमाण आहे. या काळात अमेरिकन कंपन्यांची चांगली कमाई होत आहे.

Loading...
Advertisement

युद्धामुळे कोणाचाही फायदा होत नाही, त्याचे परिणाम घातकच असतात असे म्हटले जाते. मात्र, शस्त्रात्रे तयार करणाऱ्या कंपन्या मात्र या काळात प्रचंड पैसा कमावत आहेत. युद्धाच्या तडाख्यात शहरेच्या शहरे उद्धवस्त झाली आहेत. जगाची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. लाखो लोकांना आपले हक्काचे घर सोडून दुसऱ्या देशात आश्रय घेणे भाग पडले आहे, असे अत्यंत घातक परिणाम या युद्धामुळे होत असताना दुसरीकडे मात्र शस्त्रांचा बाजारात अब्जावधींची उलाढाल होत आहे.

Advertisement

चीन-पाकिस्तानचा खतरनाक प्लान..! भारताला घेरण्यासाठी ‘या’ देशाला देणार शस्त्रे; पहा, पाकिस्तान काय करणार..?

Advertisement

रशिया-युक्रेन युद्धामुळे अमेरिका हैराण नाही तर होणार मालामाल; पहा, रशियाला कसा बसणार झटका..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply