Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. एका ब्रेडसाठी द्यावे लागतात ‘इतके’ पैसे; चीनच्या कृपेने शेजारी देश होतोय बेहाल..! जाणून घ्या..

दिल्ली : सध्या श्रीलंकेत खाद्य पदार्थांचे संकट इतके वाढले आहे, की तेथील लोकांना सोने खरेदी करण्यापेक्षा खाद्यपदार्थ विकत घेणे कठीण झाले आहे. देशाचा परकीय चलन साठा जवळपास रिकामा आहे. चीनसह अनेक देशांच्या कर्जाखाली दबलेला श्रीलंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. जानेवारीमध्ये श्रीलंकेचा परकीय चलन साठा 70 टक्क्यांनी घसरून $2.36 अब्ज झाला आहे. परकीय चलनाच्या कमतरतेमुळे श्रीलंकेला परदेशातून अन्न, औषध आणि इंधन यासह सर्व आवश्यक वस्तू आयात करणे अशक्य आहे.

Advertisement

एन.के. सिलोन बेकरी ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष जयवर्धने म्हणाले की, काही शहरी भागात स्वयंपाकाच्या गॅसच्या कमतरतेमुळे ब्रेडच्या किमती दुप्पट होऊन सुमारे 150 श्रीलंकन ​​रुपये ($0.75) पर्यंत पोहोचल्या आहेत. श्रीलंकेत एलपीजीचा प्रचंड दुष्काळ आहे, त्यामुळे 1000 बेकरी बंद कराव्या लागल्या आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला एका उद्योग संघटनेने माहिती दिली की, देशात परकीय चलनाच्या साठ्याच्या कमतरतेमुळे गॅस उपलब्ध होत नाही.

Advertisement

देशात इंधनाच्या कमतरतेमुळे अनेक वीजनिर्मिती केंद्रेही बंद करावी लागली आहेत. वीजपुरवठा वारंवार बंद करावा लागत आहे. दिवसातील सात तासांहून अधिक काळ वीज गायब होऊ लागली आहे. गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेतील राष्ट्रीय ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित मानक चलनवाढीचा दर डिसेंबर 2021 मध्ये 14 टक्क्यांवर पोहोचला. नोव्हेंबरमध्ये तो 11.1 टक्के होता. राष्ट्रीय ग्राहक किंमत निर्देशांकानुसार, डिसेंबरमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती 6.3 टक्क्यांनी वाढल्या, तर अखाद्य वस्तूंच्या किमती 1.3 टक्क्यांनी वाढल्या.

Loading...
Advertisement

श्रीलंका सध्या परकीय चलनाच्या संकटाचा सामना करत आहे. त्याचा परकीय चलनाचा साठा सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या चलनाचे मूल्य कमी होत असून आयातही खर्चिक होत आहे. या परिस्थितीत भारताने शेजारील देश श्रीलंकेला $90 दशलक्षपेक्षा जास्त कर्ज देण्याची घोषणाही केली होती. यामुळे देशाला परकीय चलनाचा साठा वाढण्यास आणि अन्नधान्याची आयात करण्यास मदत होईल.

Advertisement

श्रीलंकेच्या या स्थितीला विदेशी कर्ज, विशेषतः चीनकडून घेतलेले कर्जही कारणीभूत आहे. श्रीलंकेवर चीनचे 5 अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे. देशातील आर्थिक संकटावर मात करण्यासाठी गेल्या वर्षी चीनकडून आणखी 1 अब्ज डॉलरचे कर्ज घेतले. पुढील 12 महिन्यांत कर्ज देण्यासाठी सुमारे $7.3 अब्ज डॉलरची गरज आहे.

Advertisement

चीनच्या कृपेने श्रीलंका बेहाल..! पहा काय वाईट स्थिती झालीय शेजारी देशाची

Advertisement
Advertisement

Leave a Reply