Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Gold Price Today : 53 हजारांपेक्षाही कमी सोन्याचा भाव; पहा, आज किती घटलेत सोन्या-चांदीचे भाव..

मुंबई : जागतिक बाजारातील घडामोडींमुळे शुक्रवारी भारतीय बाजारातही सोने-चांदीच्या किमती कमी झाल्याचे दिसून आले. सोन्याचा वायदा भाव 53 हजार रुपयांच्या खाली आला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सकाळी 9.53 वाजता सोन्याचा वायदा भाव 338 रुपयांनी घसरून 52,901 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. चांदीचा वायदाही 70 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. आज चांदीचा दर 441 रुपयांनी कमी झाला आणि तो प्रति किलो 70,030 रुपयांवर पोहोचला आहे.

Advertisement

जागतिक बाजारातही सोन्या-चांदीचे दर कमी झाले आहेत. अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट किंमत $8.50 ने घसरून $1,991.90 प्रति औंस झाली. त्याचप्रमाणे, चांदीची स्पॉट किंमत देखील $ 0.12 ने कमी झाली आहे. सकाळच्या सत्रात चांदीचा दर 26.12 डॉलर प्रति औंस होता.

Advertisement

दिल्ली सोने मार्केटमध्ये शुक्रवारी सकाळी 22 कॅरेटसाठी सोन्याची किंमत 48,200 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. त्याच वेळी, 24 कॅरेट सोन्याचा भाव 52,580 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. मुंबईतही 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव दिल्लीप्रमाणेच राहिला. मुंबई आणि चेन्नईमध्ये चांदीचा दर 74,100 रुपये किलोवर पोहोचला आहे.

Loading...
Advertisement

जागतिक बाजारात सध्या सुरू असलेल्या तणावामुळे सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. जगभरातील देश आपली अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी सोन्याची खरेदी करत आहेत, त्यामुळे जागतिक बाजारपेठेत सातत्याने वाढ होत आहे. भारत हा सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे आणि येथे मागणी वाढल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमतही वाढेल. 2022 च्या अखेरीस सोन्याचा भाव 58 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.

Advertisement

रशिया-युक्रेन संकटाने इक्विटी मार्केटला मोठा फटका बसला आहे आणि तेलाच्या किमती 14 वर्षांच्या विक्रमी पातळीवर आहेत. युक्रेनमधील युद्ध थांबण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी कठोर पाश्चात्य निर्बंध आणि व्यापक आंतरराष्ट्रीय निषेध असूनही युक्रेन शरण येईपर्यंत हमले सुरुच ठेवणार असल्याचे ठरवल्याचे दिसत आहे. या युद्धाचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावरही होत आहे.

Advertisement

आहात का तयार.. कारण खिसा खाली होणार..! म्हणून सोने, पेट्रोलसह ‘त्या’ गोष्टींचा महागाई बॉंब फुटणार

Advertisement
Advertisement

Leave a Reply