Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आता निवडणुका नाहीत.. मग, मोफत रेशन योजनेचे काय होणार ? ; पहा, काय सुरू आहेत हालचाली..

नवी दिल्ली : लोक कल्याणकारी योजनांच्या जोरावर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजप पुन्हा सत्तेत आल्याने केंद्रातील मोदी सरकार यानंतरही गरिबांना मोफत धान्य पुरवठा सुरू ठेवणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण, आता निवडणुका संपल्या आहेत, आणि दुसरीकडे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा (PMGAY) सध्याचा टप्पा 31 मार्च रोजी संपणार आहे.

Advertisement

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिरिक्त गहू आणि तांदूळ खरेदी आणि साठवणुकीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. या बैठकीला भारतीय अन्न महामंडळाचे अधिकारीही उपस्थित होते. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, केंद्र सरकार यंदा नवीन खरेदीसाठी गोदामांमध्ये अधिक जागा मोकळी करण्याचा विचार करत आहे. त्यासाठी अतिरिक्त स्टॉकच्या निर्यातीसह विविध पर्यायांचा विचार केला जात आहे.

Advertisement

पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला सरकार शेतकऱ्यांकडून धान्य खरेदीला सुरुवात करणार आहे. FCI कडे सुमारे 520 लाख टन अन्नधान्याचा साठा आहे, ज्यामध्ये सुमारे 240 लाख टन गहू आणि उर्वरित 280 लाख टन तांदूळ आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू ठेवण्याचा विचार केल्यास अन्नधान्याची कोणतीही टंचाई जाणवणार नाही.

Loading...
Advertisement

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीआधी कोविड रिलीफ पॅकेजचा भाग म्हणून डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 दरम्यान उत्तर प्रदेशातील गरिबांना 6,000 कोटी रुपयांच्या केंद्रीय अनुदानासह 21 लाख टन गहू आणि तांदूळ मोफत वाटण्यात आले. PMGKAY अंतर्गत, केंद्र सरकार गरिबांना दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो मोफत धान्य देते.

Advertisement

ही योजना राज्यांमध्ये दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी सरकारी रेशन दुकानांवर उपलब्ध अनुदानित आणि मोफत अन्नधान्य योजनेव्यतिरिक्त आहे. उत्तर प्रदेशच्या सरकारने आपल्या वतीने डाळी, साखर, हरभरा आणि खाद्यतेलाचे वितरण समाविष्ट केले आहे. अशा प्रकारे, या राज्यातील गरीब कुटुंबांना दरमहा 5 किलो गहू-तांदूळ, 1-1 किलो हरभरा आणि डाळी, 1 लिटर खाद्यतेल आणि साखर प्रति युनिट मिळते.

Advertisement

मोदी सरकारने या वर्षात सुरू केल्यात ‘या’ 6 योजना; जाणून घ्या, काय आहेत योजनांचे फायदे ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply