Maharashtra Budget 2022 : आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार.. जाणून घ्या, महत्वाचे अपडेट..
मुंबई : आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार 2022-23 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. याआधी गुरुवारी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला होता. कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध मागे घेतले गेल्यानंतर उद्योग आणि सेवा क्षेत्रात मोठी वाढ झाल्याचे या अहवालाद्वारे समोर आले.
आर्थिक पाहणी अहवालातील माहितीनुसार, 2021-22 मध्ये राज्यातील उद्योग क्षेत्रात 19.9 टक्क्यांनी वाढ झाली. तर सेवा क्षेत्रात 13.5 टक्क्यांनी वाढ नोंदली गेली आहे. केंद्र सरकारने मागील नोव्हेंबर महिन्यात इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात करुन लोकांना दिलासा दिला. त्यानंतर काही राज्यांनी व्हॅट कमी केला. या निर्णयांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती काही प्रमाणात कमी झाल्या.
राज्य सरकारने मात्र याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत येथे इंधनासाठी जास्त पैसे द्यावे लागत आहेत. मात्र, यामुळे कोरोना काळाच्या तुलनेत राज्याच्या एकूण उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे आता राज्य सरकार जनतेला काही दिलासा देईल, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे. यााबाबत अंतिम निर्णय मात्र राज्य सरकार घेणार आहे.
आज दुपारी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधासभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात सरकार कोणते दिलासा देणारे निर्णय जाहीर करणार, कोणत्या महत्वाच्या घोषणा करणार, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यानंतर साधारण महिनाभरानंतर राज्य सरकार राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहे.
वाव.. फक्त एकाच वर्षात 5 लाख लोकांना मिळणार रोजगार; पहा, काय सुरू आहे या भाजप राज्यात..