Take a fresh look at your lifestyle.

आहात का तयार.. कारण खिसा खाली होणार..! म्हणून सोने, पेट्रोलसह ‘त्या’ गोष्टींचा महागाई बॉंब फुटणार

मुंबई : 24 फेब्रुवारीपासून सुरू झालेले युक्रेन-रशिया युद्ध अजूनही सुरू असून त्यामुळे आगामी काळात महागाई आणखी वाढू शकते. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 140 डॉलरच्या पुढे गेली आहे. जी 14 वर्षांची उच्च पातळी आहे. कच्च्या तेलाच्या महागाईमुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. अशावेळी भारतात केंद्रा आणि राज्य सरकारचा अफाट कर यात भर घालत आहे. त्याचा फटका सामान्य जनतेला बसणार आहे. कारण, आता निवडणुकीचे युद्ध संपल्यावर केंद्र सरकार सामान्य जनतेवर महागाई बॉंब फोडण्याच्या बातम्या येत आहेत.

Advertisement

याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपया सर्वात कमकुवत स्थितीत पोहोचला आहे. सध्या 1 डॉलरची किंमत 77 रुपयांच्या पुढे गेली आहे. अशा परिस्थितीत महागाई आणखी वाढू लागली आहे. याशिवाय नैसर्गिक वायूच्या किमतीमुळे आगामी काळात एलपीजी-सीएनजीच्या किमतीतही वाढ होऊ शकते. त्याचबरोबर धातूच्या किमतीतही वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होईल ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत. सर्वात आधी जाणून घ्या कच्च्या तेलाच्या किमतीमुळे तुमच्यावर काय परिणाम होईल. रशिया तेल आणि नैसर्गिक वायूचा प्रमुख उत्पादक आहे. रशिया युरोपियन युनियनच्या नैसर्गिक वायूच्या आयातीपैकी 40% पुरवठा करतो. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने पेट्रोल आणि डिझेल महागणार आहे. यामुळे वाहतूक खर्च वाढेल आणि त्यामुळे खाद्यपदार्थ महाग होतील. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 140 रुपयांवर पोहोचले असून, हा 14 वर्षांचा उच्चांक आहे.

Advertisement

24 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाले तेव्हा कच्चे तेल $100 वर व्यापार करत होते, जे आता 140 वर पोहोचले आहे. म्हणजेच केवळ 13 दिवसांत कच्चे तेल 40% महाग झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 1 डॉलरने वाढली असताना, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रति लिटर 50-60 पैशांनी वाढतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 25 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याच वेळी, सरकारी तेल कंपन्या लवकरच त्यांच्या किमतीत रुपयांनी वाढ करू शकतात. याशिवाय युक्रेन-रशिया युद्धामुळे नैसर्गिक वायूची पुरवठा साखळीही बिघडली आहे. जगातील एकूण नैसर्गिक वायू उत्पादनात रशियाचा वाटा 17 % आहे. अशा स्थितीत युक्रेन-रशिया वादामुळे त्याच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. यामुळे जागतिक स्तरावर गॅस टंचाईचा परिणाम दिसू लागला असून येत्या काही दिवसांत एलपीजी आणि सीएनजीच्या किमती 10 ते 15 रुपयांनी वाढू शकतात.

Advertisement

याशिवाय सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. युद्धादरम्यान, म्हणजेच अवघ्या 13 दिवसांत ते साडे 51 हजारांवरून 54 हजारांवर आले आहे. तज्ज्ञांच्या मते, सोने 56 हजारांपर्यंत जाऊ शकते. याशिवाय चांदीबाबत बोलायचे झाले तर ते 67 हजार ते 71 हजारांवर आले असून, यंदा 80 ते 85 हजार रुपये प्रतिकिलोची पातळी दाखवू शकते. अॅल्युमिनियम, निकेल आणि तांबे तेजीत राहण्याचा अंदाज आहे. सूर्यफूल तेलाच्या बाबतीत भारत यासाठी जवळजवळ पूर्णपणे रशिया आणि युक्रेनवर अवलंबून आहे. भारतातील सूर्यफूल तेलाच्या एकूण आयातीपैकी 90 टक्क्यांहून अधिक आयात या दोन देशांमधून होते. रशिया-युक्रेन युद्धामुळे देशातील सूर्यफूल तेलाचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे सूर्यफूल तेलाला पर्याय म्हणून खरेदीदार पामतेल आणि सोया तेलाकडे वळत आहेत. त्यामुळे या तेलांच्या किमती वाढू लागल्या आहेत. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान त्याच्या किमतीत 10 ते 35 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply