बाब्बो.. अमेरिका युक्रेनला देणार तब्बल 13.6 अब्ज डॉलर; पहा, मदत देण्याचे काय आहे कारण..?
दिल्ली : रशिया आणि युक्रेन युद्ध अजूनही सुरुच आहे. या युद्धात युक्रेनचे अतोनात नुकसान झाले आहे. मदत करण्याचे आश्वासन देऊनही ऐनवेळी अमेरिका आणि युरोपिय देशांनी युक्रेनला लष्करी मदत नाकारली. तरी देखील आज 15 दिवसांपासून युक्रेन रशिया विरोधात संघर्ष करत आहे. या देशांनी युक्रेनला थेट लष्करी मदत दिली नसली तरी आर्थिक स्वरुपात हे देश युक्रेनला मोठी मदत करत आहेत. जागतिक संस्थाही मदत करत आहेत. आता अमेरिकेने युक्रेनला पुन्हा मदत देण्याचे ठरवले आहे.
अमेरिकेने बुधवारी एक व्यापक खर्च विधेयक मंजूर केले जे युद्धग्रस्त युक्रेन आणि युरोपियन मित्र राष्ट्रांना मदत करण्यासाठी $ 13.6 अब्ज देणार आहे. रशियाकडून तेल आयातीवर बंदी घालणारे विधेयकही संसद सभागृहात प्रचंड बहुमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकांना लवकरच सिनेटची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) युक्रेनसाठी आणीबाणी वित्तपुरवठा अंतर्गत $1.4 अब्ज निधीलाही मंजुरी दिली आहे.
जो बायडेन यांनी गेल्या आठवड्यात युक्रेनच्या लष्करी, मानवतावादी आणि आर्थिक मदतीसाठी 10 अब्ज डॉलर्स देण्याचे आवाहन केले होते जे डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन खासदारांच्या पाठिंब्याने $ 13.6 अब्जपर्यंत वाढले. आम्ही युक्रेनला अन्याय, दडपशाही आणि हिंसक कारवाईच्या विरोधात पाठिंबा देऊ, असे बायडेन यांनी सांगितले.
दरम्यान, जागतिक बँकेने युक्रेनसाठी तब्बल $723 दशलक्ष आर्थिक पॅकेज मंजूर करण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे, की जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळाने सोमवारी युक्रेनसाठी पूरक बजेट मदत पॅकेज मंजूर केले. निवेदनानुसार, “बोर्ड-मंजूर पॅकेजमध्ये $350 दशलक्षसाठी पूरक कर्ज आणि $139 दशलक्ष हमींचा समावेश आहे. $134 दशलक्ष अनुदान वित्तपुरवठा आणि $100 दशलक्ष समांतर वित्तपुरवठा देखील एकत्रित करत आहे. अशा प्रकारे बँकेने युक्रेनला 723 दशलक्ष डॉलर्स एकूण मदत जाहीर केली आहे.”
Russia-Ukraine War : युक्रेनला मिळालीय मोठी मदत; पहा, काय मिळणार या युद्धग्रस्त देशाला..?