Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भारीच की.. स्मार्टफोन खरेदीवर मिळणार 2400 रुपये कॅशबॅक; पहा, कोणत्या कंपनीने दिलीय ही भन्नाट ऑफर..?

मुंबई : जर तुम्ही Vodafone Idea कंपनीचे ग्राहक असाल आणि अजूनही फीचर फोन चालवत असाल तर तुम्हाला कंपनीच्या या उत्तम ऑफरबद्दल माहिती असणे आवश्यक आहे, जी लवकरच कालबाह्य होणार आहे. खरे तर, आम्ही नवीन स्मार्टफोनच्या खरेदीवर कॅशबॅक ऑफरबद्दल माहिती देत आहोत. व्होडाफोन आयडीया प्रमाणेच Airtel देखील आपल्या ग्राहकांना अशीच ऑफर देत आहे. नवीन स्मार्टफोन खरेदीवर कॅशबॅक ऑफर. Vodafone Idea 2G वापरकर्त्यांना शक्य तितक्या लवकर 4G वर अपग्रेड करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहे. ही ऑफर काय आहे? ऑफर कधी संपत आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या..

Advertisement

कंपनीने पुढील 24 महिन्यांसाठी पात्र ग्राहकांना दरमहा 100 रुपयांचा कॅशबॅक दिला आहे. म्हणजेच दोन वर्षांच्या कालावधीत एकूण 2400 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. ही मर्यादित कालावधीची ऑफर आहे, जी 31 मार्च 2022 रोजी संपणार आहे. तुम्ही सुद्धा 2G ग्राहक असाल तर तुम्हाला त्याचा कसा फायदा होऊ शकतो ते त्वरीत माहित करुन घ्या.

Advertisement

कॅशबॅकसाठी पात्र होण्यासाठी 2G फोन युजर्सना ऑफर कालावधी दरम्यान 4G स्मार्टफोनमध्ये अपग्रेड करणे आवश्यक आहे. इतकेच नाही तर कॅशबॅक मिळवण्यासाठी युजर्सना पुढील 24 महिन्यांसाठी किमान 299 रुपये किंवा त्याहून अधिक प्रीपेड प्लॅनसह रिचार्ज करणे आवश्यक आहे. प्रत्येक रिचार्जवर 100 चा डिस्काउंट मिळवण्यासाठी ग्राहकाला कॅशबॅक कूपन रिडीम करण्यासाठी Vi अॅपद्वारे रिचार्ज करणे आवश्यक आहे.

Loading...
Advertisement

ऑफर प्रत्येक नंबरवर फक्त एकदाच लागू होईल. तसेच, ऑफरसाठी आधीपासून वापरलेला कोणताही स्मार्टफोन भविष्यात पुन्हा वापरता येणार नाही. युजर्सना ऑफर केलेल्या 100 रुपयांच्या कॅशबॅक कूपनची वैधता केवळ 30 दिवसांची असते आणि त्या कालावधीनंतर ती कालबाह्य होईल. कंपनीने सांगितले की जर संबंधिताने पात्र प्लॅनसह रिचार्ज केले नाही तर कॅशबॅक कूपन मिळणार नाही. ही ऑफर 18 डिसेंबर 2021 रोजी telco ने लाँच केली होती आणि ती 31 मार्च 2022 पर्यंत सुरू राहणार आहे.

Advertisement

फायदाच फायदा..! Jio च्या ‘या’ रिचार्ज प्लान्सवर मिळतोय 200 रुपयांचा कॅशबॅक; चेक करा, डिटेल..

Advertisement

अरे वा.. आता स्कूटर खरेदीवरही मिळतोय जबरदस्त कॅशबॅक.. ‘या’ कंपनीने सुरू केलीय खास योजना

Advertisement
Advertisement

Leave a Reply