Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कार खरेदी करण्याचा आहे विचार..? ; मग, आधी ‘ही’ महत्वाची माहिती वाचा; पहा, कार कंपन्यांचा काय आहे प्लान..

मुंबई : जागतिक वाहन उद्योगाला सध्या विविध प्रकारच्या धातू दरवाढीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे वाहनांच्या किमती वाढतील असा अंदाज व्यक्त होत आहे. रशिया-युक्रेन संघर्षाच्या काळात कार निर्माता कंपन्या या संकटाचा सामना करत आहेत. युक्रेनवरील रशियन आक्रमणामुळे कारमध्ये वापरल्या जाणार्‍या धातूंच्या किमती वाढत आहेत. कार बनवण्यामध्ये अॅल्युमिनियमपासून ते कैटेलिटिक कन्वर्टर्स मेध्ये पेलेडियम आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमध्ये निकेलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पॅलेडियम हा सर्वात महाग धातू आहे आणि रशिया पॅलेडियमचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे.

Advertisement

धातूच्या किमती वाढण्याबरोबरच पुरवठा साखळीतील व्यत्ययाचाही वाहन उद्योगावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. युक्रेन संकटाचा परिणाम म्हणून कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतील. याव्यतिरिक्त, युक्रेन संकटामुळे सेमी कंडक्टरची कमतरता होऊ शकते. युक्रेन हा निऑनचा प्रमुख उत्पादक देश आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे निऑन उत्पादन आणि पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे.

Advertisement

स्टेलांटिसचे सीईओ कार्लोस टावरेस म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत कच्चा माल आणि ऊर्जेच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे वाहन उद्योगाच्या व्यवसायावर अधिक ताण येईल. याचा दबाव ग्राहकांवर पडेल, म्हणजे त्यांना जास्त किमतीत वाहने खरेदी करावी लागतील, असे अपेक्षित आहे.

Loading...
Advertisement

सोमवारी अॅल्युमिनिअम आणि पॅलेडियमने विक्रमी पातळी गाठली. निकेल, ज्याचा वापर ऑटोमेकर्ससाठी स्टेनलेस स्टील बनवण्यासाठी केला जातो, मंगळवारी प्रथमच प्रति टन $100,000 चा टप्पा पार केला. कोविड-19 संकट आणि संबंधित अडचणींमुळे जागतिक वाहन उद्योग दबावाखाली आहे. युक्रेन संकट अशा वेळी सुरू झाले जेव्हा वाहन उद्योग कोविड संकटातून सावरत होता. त्यामुळे नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. याचा त्रास आज वाहन कंपन्या सहन करत आहेत. मात्र, जर त्यांनी वाहनांच्या किंमतीत वाढ केली तर नंतर लोकांनाही या संकटाचा त्रास सहन करावा लागणार आहे.

Advertisement

‘त्यामुळे’ घर, कार खरेदी ठरणार त्रासदायक; पहा, कोणत्या दरवाढीचा सगळ्यांनाच बसणार दणका..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply