Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी..! केंद्र सरकारवर लवकरच देऊ शकते खुशखबर; पहा, काय आहे सरकारचे नियोजन..

मुंबई : केंद्र सरकार केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच एक खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. येत्या 16 मार्च रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. बैठकीत महागाई भत्ता 31 टक्क्यांवरून 34 टक्के केला जाऊ शकतो. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे 50 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि 65 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.

Advertisement

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, सरकार मूळ वेतनावर डीए काढते. आज, 10 मार्च रोजी 5 राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर आदर्श आचारसंहिताही संपणार आहे. यानंतर सरकार डीएबाबत निर्णय घेऊ शकते. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 31 टक्के डीए मिळतो. यामध्ये 3 टक्क्यांनी वाढ झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कमाल 20,000 रुपये आणि किमान 6480 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे.

Advertisement

AICPI (औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक) च्या आकडेवारीनुसार, DA डिसेंबर 2021 पर्यंत 34.04% वर पोहोचला आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18,000 रुपये प्रति महिना असेल, तर नवीन DA (34%) दरमहा 6120 रुपये मिळेल. सध्या 31% DA वर 5580 रुपये मिळतात.

Loading...
Advertisement

दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये डीए बदलला जातो. देशात पहिल्यांदा 1972 मध्ये मुंबईत महागाई भत्ता सुरू करण्यात आला. यानंतर केंद्र सरकारने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी जुलै आणि ऑक्टोबरमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये दोनदा वाढ करण्यात आली होती. जुलै 2021 मध्ये, सरकारने महागाई रिलीफ (DR) 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढ केला होता. सरकार याबाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. 16 मार्च रोजी होणाऱ्या या बैठकीत निर्णय घेण्यात येऊ शकतो, अशी चर्चा असली तरी हे सर्व काही केंद्र सरकावर अवलंबून आहे.

Advertisement

सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा दणका.. महागाई भत्त्याबाबत मोठा निर्णय..!

Advertisement

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर..! पहा, महागाई भत्त्याबाबत काय आहे सरकारचे नियोजन ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply