Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आर्थिक निर्बंधांमुळे रशिया हैराण..! भारताला दिलीय ‘ही’ खास ऑफर; पहा, कसा होणार भारताचा फायदा..

दिल्ली : युक्रेन विरोधातील युद्धाची शिक्षा रशियाला कठोर निर्बंधांच्या रूपात मिळत आहे. अमेरिकेसह युरोपीय देशांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. दरम्यान, निर्बंधांमुळे अडचणीत आलेल्या रशियन तेल कंपन्या भारताला तेलावर भरघोस डिस्काउंट देत आहेत. या रशियन कंपन्या भारताला कच्च्या तेलाच्या किमतीवर 25-27 टक्क्यांपर्यंत सूट देत आहेत.

Advertisement

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, युक्रेनवरील हल्ल्यामुळे अनेक रशियन बँकांना आंतरराष्ट्रीय बँकिंग प्रणाली SWIFT बँकिंग प्रणालीतून काढून टाकण्यात आले आहे. त्यानंतर रशियासाठी इतर देशांबरोबर व्यापार करणे कठीण झाले आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी रशिया सरकार नवीन पेमेंट सिस्टम तयार करण्यात गुंतले आहे. तसे घडल्यास रशियाचा भारताबरोबरचा तेल व्यापार वाढू शकेल.

Advertisement

भारत रशियाची सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी रोसनेफ्टकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी करतो. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारताला भेट दिली तेव्हा रोझनेफ्ट आणि इंडिया ऑइल कॉर्पोरेशनने 2022 च्या अखेरीस नोव्होरोसियस्क बंदरातून भारताला 20 दशलक्ष टन तेल पुरवठा करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. भारत अमेरिका आणि रशियासारख्या देशांकडून तेल खरेदीत वाढ करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Loading...
Advertisement

अहवालात सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे, की रशियन तेल कंपन्या ब्रेंट क्रूड तेलाच्या जुन्या किमतींवर 25-27 टक्के सूट देत आहेत, हा निश्चितच एक फायदेशीर प्रस्ताव आहे. मात्र, तेल खरेदीचा मोबदला कसा मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की निर्बंधांदरम्यान रशियाशी व्यापार सुरू करण्याआधी भारताने अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे.

Advertisement

एका अहवालानुसार, निर्बंध लागू होण्याआधी रशियन कच्च्या तेलाची किंमत 11.60 बॅरलने कमी झाली. असे असूनही, रशियावरील संभाव्य निर्बंधांमुळे तेलासाठी खरेदीदार सापडले नाहीत. अनेक रशियन बँकांना SWIFT बँकिंग प्रणालीतून काढून टाकण्यात आले आहे, ज्यामुळे जगातील इतर देशांना रशियासोबत व्यापार करणे कठीण झाले आहे. भारत सरकार आणि रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया रशियामधून तेलाच्या आयातीसाठी पैसे देण्यासाठी पर्यायी मार्ग शोधत आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी बँका आणि कंपन्यांबरोबर चर्चा सुरू आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply