दिल्ली : युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धा दरम्यान चीनने मदतीचा हात पुढे केला आहे. चीनने सांगितले, की ते युक्रेनला 5 दशलक्ष युआन (सुमारे $ 7.91 लाख) अन्नधान्य आणि इतर दैनंदिन वस्तू मदत म्हणून पाठवत आहे. मात्र, या देशाविरुद्ध युद्ध सुरू केले म्हणून रशियाविरुद्ध टाकण्यात येत असलेल्या निर्बंधांनाही चीनने विरोध सुरुच ठेवला आहे. अशा पद्धतीचे राजकारण आता चीनने सुरू केले आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिजिआन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, मदतीची पहिली खेप बुधवारी युक्रेनला सुपूर्द करण्यात आली आणि दुसरी खेप लवकरच पाठवण्यात येणार आहे. चीन मोठ्या प्रमाणावर रशियाला पाठिंबा देत आहे आणि लिजिआन यांनी पुन्हा सांगितले, की चीन रशियाविरूद्ध आर्थिक निर्बंधांना विरोध करतो. अन्न आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेली ही मदत युक्रेनच्या विनंतीनुसार केली आहे आणि शक्य तितक्या लवकर वितरित केली जाईल.
प्रतिबंधांच्या कारवाईमुळे प्रत्येक वेळी शांतता आणि सुरक्षितता आणता येईल, असे नाही. मात्र संबंधित देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि सामान्य लोकांच्या जीवनमानासाठी गंभीर अडचणी निर्माण करेल. ते म्हणाले, की चीन आणि रशिया परस्पर आदर, समानता आणि परस्पर फायद्याच्या भावनेने तेल आणि वायूसह सामान्य व्यावसायिक सहकार्य सुरू ठेवतील. अमेरिका नाटो विस्तारावर रशियाच्या “कायदेशीर” सुरक्षेच्या मुद्द्यांचा योग्य विचार करण्यात अयशस्वी ठरल्याने संघर्ष निर्माण करण्यासाठी अमेरिकेलाच जबाबदार धरावे, असा गंभीर आरोप चीनने केला आहे.
दरम्यान, याआधी चीननेही नाटोवर आरोप केला होता. युक्रेन-रशिया युद्धाबाबत चीनने नाटोवर (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायजेशन) मोठे आरोप केले आहेत. चीनने म्हटले होते, रशिया आणि युक्रेनमधील तणाव नाटोने युद्धाच्या परिस्थितीपर्यंत नेऊन ठेवला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिजिआन यांनी अमेरिकेला चीनच्या चिंता गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले आणि युक्रेनचा प्रश्न आणि रशियाबरोबरील संबंध सांभाळण्यात आपले अधिकार किंवा हितसंबंध कमी करणे टाळावे.
रशियानंतर आता चीनही ‘NATO’ वर भडकला..! पहा, युद्धाबाबत काय केलाय गंभीर आरोप..?
Russia-Ukraine War : .. तरीही रशिया करतोय चीनचा विचार; अमेरिकेला उत्तर देण्यासाठी ‘हा’ असेल प्लान..