मतमोजणीआधीच मिळाली खुशखबर..! ‘या’ निवडणूक राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर घटले; जाणून घ्या..
दिल्ली : देशातील 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीआधीच सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केला आहे. निवडणुकीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे उत्तर प्रदेश राज्याची राजधानी लखनऊ आणि दिल्ली शेजारील नोएडा शहरात आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या आहेत. मतमोजणी होऊन निकाल हाती येण्याआधीच उत्तर प्रदेशातील लोकांनी थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र तरीही देशातील चारही महानगरांमध्ये तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोलचा दर सर्वाधिक 110 रुपये प्रतिलिटर आहे. जागतिक बाजारपेठेत क्रूड प्रति बॅरल $130 वर पोहोचल्यानंतरही कंपन्यांनी किमतीत वाढ केलेली नाही.
सध्या राजधान दिल्लीमध्ये पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर, चेन्नईमध्ये पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर आणि कोलकाता शहरात पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर या दराने मिळत आहे.
तर दुसरीकडे उत्तर प्रदेश राज्यातील काही शहरांमध्ये आज तेल कंपन्यांनी इंधनाचे दर कमी केले आहेत. यामध्ये नोएडामध्ये पेट्रोल 95.36 रुपये प्रति लिटर झाले आहे, जे एका दिवसाआधी 95.73 रुपये होते. त्याचप्रमाणे डिझेलही प्रतिलिटर 87.21 रुपयांवरून 86.87 रुपयांवर आले आहे. राजधानी लखनऊमध्येही पेट्रोलचा दर एका दिवसाआदी 95.28 रुपयांवरून 95.14 रुपयांवर आला आहे. डिझेलही 86.80 रुपयांवरून 86.68 रुपये प्रति लिटरवर आले आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नव्या दरांची सकाळी 6 वाजल्यापासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते.
निवडणुकीनंतर पेट्रोलचे भाव वाढणार..? ; पहा, पेट्रोलियम कंपन्या कोणता निर्णय घेण्याच्या तयारीत..?