Take a fresh look at your lifestyle.

जगात सर्वाधिक विकले गेलेत ‘हे’ 10 स्मार्टफोन..! खरेदीआधी जाणून घ्या, कोणता स्मार्टफोन ठरला नंबर वन..?

मुंबई : स्मार्टफोन घेण्याचा प्लान आहे पण कोणता स्मार्टफोन घ्यायचा, कोणता स्मार्टफोन मार्केटमध्ये बेस्ट आहे, विक्री किती होत आहे याचा अंदाज येत नाही. तर काळजी करू नका. या अहवालामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की स्मार्टफोन मार्केटमध्ये सध्या कोणत्या कंपनीचे वर्चस्व आहे आणि कोणत्या स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री होत आहे.

Advertisement

खरे तर, काउंटरपॉईंटच्या नवीन संशोधनानुसार, Apple, Samsung आणि Xiaomi मधील स्मार्टफोन्सने 2021 च्या टॉप-10 जागतिक स्मार्टफोन यादीत नंबर मिळवला आहे. या यादीत अॅपल कंपनी पहिल्या क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण कोरियाची दिग्गज कंपनी सॅमसंग आणि तिसऱ्या क्रमांकावर चीनी कंपनी शाओमी आहे.

Advertisement

2021 मधील आघाडीचे 5 स्मार्टफोन हे Apple कंपनीचे होते. iPhone 12 हा सर्वाधिक विक्री होणारा फोन होता, त्यानंतर iPhone 12 Pro Max, iPhone 13, iPhone 12 Pro आणि iPhone 11 यांचा क्रमांक आहे. अॅपलच्या एकूण विक्रीत या तीन स्मार्टफोनचा हिस्सा 41 टक्के आहे.

Advertisement

काउंटरपॉईंटच्या मते, जागतिक बाजारपेठेत 4,200 पेक्षा जास्त स्मार्टफोन मॉडेल होते आणि आघाडीच्या 10 सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टफोनचा 2021 मध्ये एकूण जागतिक स्मार्टफोन युनिट विक्रीत 19 टक्के वाटा होता, जो 2020 मध्ये 16 टक्के होता.

Advertisement

Samsung Galaxy A12 ने 2021 मध्ये सहावा क्रमांक मिळवला. जवळजवळ सर्व देशांनी वर्षभर A12 साठी जोरदार मागणी नोंदवली. उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका आणि पश्चिम युरोप याठिकाणी या स्मार्टफोनला सर्वाधिक मागणी राहिली. “सॅमसंगच्या A12 ची वैशिष्ट्ये, जसे की चांगला कॅमेरा सेटअप, बॅटरी, सहा मेमरी कॉन्फिगरेशन आणि दीर्घ सॉफ्टवेअर समर्थन यामुळे लोकांनीही या स्मार्टफोनला चांगला प्रतिसाद दिला. दरम्यान, Xiaomi च्या Redmi 9A आणि Redmi 9 ने 2021 मध्ये जोरदार कामगिरी केली. Xiaomi ने सर्व क्षेत्रात चांगली कामगिरी केली. चीन, भारत आणि आशिया-पॅसिफिक या ठिकाणी या स्मार्टफोन्सना सर्वाधिक मागणी होती.

Advertisement

जगातील टॉप-10 सर्वाधिक विक्री होणारे स्मार्टफोन (2021)
1. iPhone 12
2. iPhone 12 Pro Max
3. iPhone 13
4. iPhone 12 Pro
5. iPhone 11
6. Samsung Galaxy A12
7. Xiaomi Redmi 9A
8. iPhone SE 2020
9. iPhone 13 Pro Max
10. Xiaomi Redmi 9

Advertisement

वाव.. फक्त एक हजार रुपयांत मिळतोय ‘हा’ दमदार स्मार्टफोन; पहा, कुणी सुरू केलीय भन्नाट ऑफर..?

Advertisement

भारीच की.. स्मार्टफोन अन् इंटरनेट नाही तरीही पैसे होणार ट्रान्सफर; RBI ने सुरू केलीय ‘ही’ खास योजना; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply