Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

BSNL चे तीन पोस्टपेड प्लान..! तुमच्यासह परिवारालाही मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे; जाणून घ्या..

मुंबई : प्रीपेड प्लॅन्स व्यतिरिक्त आजकाल पोस्टपेड प्लॅन्सनाही मागणी वाढली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे खासगी कंपन्यांनी प्रीपेड रिचार्ज प्लानच्या दरात केलेली भरमसाठ वाढ. फक्त बीएसएनएलनेच आतापर्यंत कोणतीही दरवाढ केलेली नाही. हे लक्षात घेऊन सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी BSNL काही सर्वोत्तम पोस्टपेड प्लॅन ऑफर करत आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये काही पोस्टपेड प्लॅन देखील समाविष्ट आहेत ज्याचा फायदा तुमच्या परिवारालाही होईल. या प्लॅन्समध्ये कंपनी अतिरिक्त सिमसह 85 GB पर्यंत डेटा देत आहे. यामध्ये एक प्लान देखील आहे, ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांना 75 जीबी डेटा मिळेल.

Advertisement

525 रुपयांचा प्लॅन
BSNL चा हा पोस्टपेड प्लान यूजर्समध्ये खूप लोकप्रिय आहे. या प्लॅनमध्ये कंपनी देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉल देत आहे. तुम्हाला प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतात. इंटरनेट वापरासाठी 255 GB पर्यंत डेटा रोलओव्हर लाभासह एकूण 85 GB डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये कंपनी अतिरिक्त सिम देत आहे. अतिरिक्त सिममध्ये मोफत कॉल लाभ मिळणार आहे, मात्र यामध्ये मोफत एसएमएस आणि डेटा दिला जात नाही.

Advertisement

798 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये तुम्हाला दोन अतिरिक्त सिम मिळतील. प्लॅनमध्ये, कंपनी इंटरनेट वापरण्यासाठी सर्व सदस्यांना 50 जीबी डेटा आणि अमर्यादित कॉल देत आहे. 150GB पर्यंत डेटा रोलओव्हर लाभासह येत आहे. या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतील.

Loading...
Advertisement

999 रुपयांचा प्लॅन
कंपनीचा हा प्लॅन तीन फॅमिली कनेक्‍शन म्हणजेच तीन अतिरिक्त सिम ऑफर करतो. यामध्ये, प्राथमिक युजरसह उर्वरित कनेक्शनला देखील इंटरनेट वापरण्यासाठी दरमहा 75 जीबी डेटा मिळेल. प्लॅनच्या प्राथमिक युजरला 225 GB पर्यंत डेटा रोलओव्हरचा लाभ देखील मिळतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल देखील मिळतात तसेच 100 मोफत एसएमएस दिले जातात.

Advertisement

BSNL मुळे वाढलेय Airtel चे टेन्शन..! ‘या’ प्लानमध्ये मिळतात जबरदस्त फायदे; पहा, तुमच्यासाठी कोणता प्लान आहे बेस्ट ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply