Take a fresh look at your lifestyle.

रशिया-यु्क्रेन युद्धाचा परिणाम.. आज सोन्याने ‘तो’ महत्वाचा टप्पाही केलाय पार; पहा, आज काय आहेत सोन्या-चांदीचे भाव..

मुंबई : रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोन्याचे भाव दीड वर्षांच्या सर्वाधिक पातळीवर गेले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज बुधवारी सोन्याच्या भावाने 55 हजारांचाही टप्पा पार केला. कोरोना काळात ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे भाव 56 हजार 200 रुपये प्रति ग्रॅमपर्यंत पोहोचले होते. आता सोन्याने 55 हजारांचा टप्पा पार केला आहे. म्हणजेच, आता सोने लवकरच 56 हजारांचाही टप्पा पार करेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

Advertisement

रशियावर अमेरिका आणि इतर सहकारी देशांच्या निर्बंधांमुळे जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही दिसून आला आणि मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये आज सकाळी 9.15 वाजता सोन्याच्या फ्युचर्स किमती 1.64 टक्क्यांनी वाढून 55,111 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचल्या. चांदीचा भावही 2.19 टक्क्यांनी वाढून 72,950 रुपये प्रति किलो झाला.

Advertisement

जागतिक बाजारात सोन्याचे भाव विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. जागतिक बाजारात स्पॉट गोल्ड 0.6 टक्क्यांनी घसरून $2,040.07 प्रति औंसवर व्यवहार करत आहे. याआधी ते $2,069.89 च्या पातळीवर पोहोचले होते. ऑगस्ट 2020 मध्ये, जागतिक बाजारात सोन्याची किंमत $2,072.49 प्रति औंस या विक्रमी उच्चांकावर होती. येत्या काही दिवसांत सराफा बाजारात सोन्याचा भाव 56 हजारांच्या पुढे जाऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. जागतिक बाजारात सोन्याचा भाव 2,035.97 च्या वर व्यापार करत राहिल्यास देशातील बाजारपेठेत तो 56,580 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही सोन्याचा दर 55 हजारांच्या पुढे गेला होता.

Advertisement

रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील अर्थव्यवस्थेवर संकट आले असून सर्वच देश सोन्याची खरेदी जोरात करत आहेत. जगातील सर्वात मोठ्या गोल्ड-बॅक्ड एक्स्चेंज-ट्रेड (ETF) SPDR गोल्ड ट्रस्टची सोन्याचा साठा वाढून 1,067.3 टन झाला, जो मार्च 2021 नंतरचा सर्वाधिक आहे. मात्र, भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी आता सोने खरेदी करावे, असेही सांगण्यात येत आहे.

Advertisement

आज सोने-चांदीचा ट्रेंड बदलला..! सोन्या-चांदीच्या दरात कपात; पहा, आज काय आहेत नवीन भाव..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply