Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ब्राव्हो.. नगरच्या ‘सॉइलोमीटर’सह सहा स्टार्टअपची RKVY-RAFTAR प्रोग्रॅमसाठी निवड..!

पुणे : सध्या सगळीकडे स्टार्टअप (नव्या कल्पना किंवा जुन्या व्यावसायिक कल्पनांना वेगळ्या पद्धतीने तंत्रज्ञानाची जोड देऊन नवा व्यावसायिक प्रयत्न) संकल्पनांचा बोलबाला आहे. यामध्ये रितेश उषाताई भाऊसाहेब पोपळघट (सहसंस्थापक, द फार्म, केडगाव चौफुला, पुणे-सोलापूर महामार्ग, ता. दौंड, जि. पुणे; मो. 7507610449) यांनी मार्गदर्शन केलेल्या तब्बल सहा स्टार्टअप संकल्पनांची निवड RKVY-RAFTAR प्रोग्रॅमसाठी झाली आहे. निवड झालेल्या आणि त्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या नव्या दमाच्या या तरुणांचे देशभरातून कौतुक होत आहे. (The Farm Agricultural business Startup Guidance cell in Maharashtra)

Advertisement

कृषि क्षेत्रातील स्टार्टअप इंडिया RKVY-RAFTAR प्रोग्रॅमसाठी ‘द फार्म’ने मेंटरिंग केलेल्या ६ कृषि स्टार्टअपची निवड झाल्याची माहिती पोपळघट यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, अहमदनगर येथील कृषी संशोधक डॉ. प्रफुल्ल गाडगे यांच्या बायोमी टेक्नॉलॉजीने विकसित केलेल्या सॉइलोमीटर कीट Soilometer : Soil Testing Kit (from Biome Technology, Ahmednagar) यासह डॉ. अंकुश चोरमुले यांचे गन्ना मास्टर (Ganna Master), मंगेश भास्कर यांचे शाश्वत फार्मिंग, संदीप घोले यांचे कल्चर्ड क्रॉप फार्म्स (Cultured Crops Farm) यासह एकूण सहा कृषि स्टार्टअपची निवड झाल्याने आम्हाला सगळ्यांना आनंद झाला आहे. कृषि क्षेत्रामध्ये मोठी संधी आहे. यामध्ये अनेक तरुण-तरुणी स्टार्टअप करीत आहेत. त्यांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. त्याला असे भरीव यश मिळाले की मग जास्त काम करण्याची प्रेरणा मिळते.

Loading...
Advertisement

डॉ. गाडगे यांनी त्यांच्या बायोमी टेक्नॉलॉजीने विकसित केलेल्या सॉइलोमीटर कीटबाबत सांगितले की, देशातील पहिले आणि एकमेव असे हे कीट आहे. याद्वारे सॉइल मायक्रोबिअल काउंट म्हणजे जमिनीमध्ये असलेल्या जिवाणूंचे प्रमाण लक्षात येते. त्यानुसार योग्य पद्धतीने नियोजन करून मग कमी उत्पादन खर्चात अधिक उत्पादन मिळवणे शेतकऱ्यांना सहजशक्य होते. सध्या रासायनिक खत कीटकनाशक यांच्या बेसुमार वापरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात आणखी वाढ होत आहे. अशावेळी आपल्या जमिनीचा जिवंतपणा तपासण्याचे हे क्रांतिकारी कीट आहे. खूप माफक किमतीत हे उपलब्ध आहे. एका कीटद्वारे आपण आपल्या शेतात पाच ठिकाणी किंवा पाचवेळा सॉइल मायक्रोबिअल काउंटची तपासणी करू शकतो. याच्या एका कीटमध्ये ५ चाचण्या होतात.

Advertisement
Advertisement

Leave a Reply