Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukraine War : युक्रेनच्या सामर्थ्याचा रशियाचा अंदाज ठरला फेल; अमेरिकेच्या अधिकाऱ्याने केला दावा..

दिल्ली : अमेरिकेच्या एका वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याने म्हटले आहे, की रशियाने युक्रेनच्या ताकदीचा योग्य अंदाज घेतला नाही. तसेच युक्रेनच्या सामर्थ्याला कमी लेखले होते. अधिकाऱ्याने सांगितले की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युद्धात कोणत्याही परिस्थितीत पराभव स्वीकारायचा नाही. मात्र, त्यांचा विजय संघर्षाचा प्रभाव वाढवू शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले, की अमेरिकेचा असा विश्वास आहे की आक्रमण सुरू करण्याआधी रशियाने युक्रेनच्या प्रतिकारशक्तीला कमी लेखले.

Advertisement

नॅशनल इंटेलिजेंसचे डायरेक्टर एव्हरिल हेन्स यांनी काँग्रेसच्या (अमेरिकन संसद) समितीला सांगितले की, अमेरिकन अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे, की रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युद्धात पराभव होऊ नये असे वाटते. परंतु त्यांच्या विजयामुळे संघर्षाचा प्रभाव वाढू शकतो. हेन्स म्हणाले की, रशियाच्या अण्वस्त्रांच्या स्थितीत अमेरिकेला कोणताही असामान्य बदल आढळला नाही.

Advertisement

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियन तेल आणि वायू उर्जेच्या आयातीवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी अमेरिका आणि पाश्चात्य देशांना रशियन आयात कमी करण्याची वारंवार विनंती केली आहे, त्यानंतर अमेरिकेने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

रशियावर कठोर आर्थिक निर्बंध असूनही ऊर्जा निर्यातीतून रशियाचा रोख प्रवाह सुरूच आहे. ऊर्जा पुरवठ्यासाठी युरोपिय देश मोठ्या प्रमाणावर रशियावर अवलंबून आहेत. युरोपला त्याच्या नैसर्गिक वायूच्या वापरापैकी एक तृतीयांश नैसर्गिक वायू रशियाकडून पुरवठा केला जातो.

Advertisement

दरम्यान, याआधी रशियाचे उपपंतप्रधान नोव्हाक यांनी सरकारी टेलिव्हिजनवर दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, “हे अगदी स्पष्ट आहे की रशियन तेल नाकारल्याने जागतिक बाजारपेठेवर घातक परिणाम होतील. किंमतींमध्ये अनपेक्षित वाढ होईल. रशियाकडून मिळणारे तेल बदलण्यासाठी युरोपला एक वर्षाहून अधिक काळ लागेल आणि खूप जास्त किंमत द्यावी लागेल. असे घडले तर कच्च्या तेलाच्या किंमती 300 डॉलरपर्यंत पोहोचतील असा इशाराही दिला होता. मात्र, तरीसुद्धा अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी करण्यावर निर्बंध टाकण्याचा निर्णय आज घेतला आहे.

Loading...
Advertisement

अमेरिका चीनला मोठा झटका देण्याच्या तयारीत..! पहा, चीनच्या विरोधात कोणता नवा प्रस्ताव आलाय..?

Advertisement

बाब्बो.. युक्रेन युद्धाचा रशियालाही बसलाय जोरदार दणका..! रशिया ‘तिथे’ ठरलाय नंबर वन..

Advertisement

बाब्बो.. तर कच्च्या तेलाच्या किंमती होतील 300 डॉलर पार; संतापलेल्या रशियाने युरोपिय देशांना दिलाय ‘हा’ गंभीर इशारा..

Advertisement

Russia-Ukraine War : अखेर अमेरिकेने ‘तो’ निर्णय घेतलाच; रशियन तेलाचे मार्केट होणार डाऊन..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply