Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukraine War : अखेर अमेरिकेने ‘तो’ निर्णय घेतलाच; रशियन तेलाचे मार्केट होणार डाऊन..?

दिल्ली : अमेरिका आणि युरोपियन देश रशियाच्या विरोधात मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा सातत्याने सुरू होती. अखेर तसेच घडले आहे. अमेरिकेने रशियाची आर्थिक नाकेबंदी करुन देशाच्या अर्थव्यवस्थेला झटका देण्याच्या उद्देशाने मोठा निर्णय घेतला आहे. याआधी रशियानेही धमकी दिली होती. मात्र, त्याचा विचार न करता हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे रशियाचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Advertisement

युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या रशियाला अमेरिकेने मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेने मंगळवारी रशियन तेलाच्या आयातीवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला. युक्रेनवरील हमल्याचा बदला म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रशियन तेल आयातीवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. युक्रेनवरील आक्रमणानंतर अनेक देशांनी रशियावर निर्बंध आणखी घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. तथापि, रशियावर अद्याप कोणताही प्रभाव पडलेला नाही आणि युद्ध सुरूच आहे.

Advertisement

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे आता रशियाकडून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूची खरेदी बंद करणार असल्याची घोषणा ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज कंपनी शेलने केली आहे. शेलने एका निवेदनात म्हटले आहे, की ते सर्व कच्चे तेल, पेट्रोलियम उत्पादने, नैसर्गिक वायू आणि द्रवीभूत नैसर्गिक वायू (LNG) खरेदी करणे टप्प्याटप्प्याने बंद करेल. त्याच बरोबर शेलने रशियातील आपले सर्व्हिस स्टेशन आणि इतर ऑपरेशन्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शेलने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्याबद्दल टीका केली होती.

Loading...
Advertisement

दरम्यान, याआधी रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक यांनी सरकारी टेलिव्हिजनवर दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, “हे अगदी स्पष्ट आहे की रशियन तेल नाकारल्याने जागतिक बाजारपेठेवर घातक परिणाम होतील. किंमतींमध्ये अनपेक्षित वाढ होईल. रशियाकडून मिळणारे तेल बदलण्यासाठी युरोपला एक वर्षाहून अधिक काळ लागेल आणि खूप जास्त किंमत द्यावी लागेल. असे घडले तर कच्च्या तेलाच्या किंमती 300 डॉलरपर्यंत पोहोचतील असा इशाराही दिला होता. मात्र, तरीसुद्धा हा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

युक्रेनला मदत करणाऱ्या 31 शत्रू राष्ट्रांची यादी रशियाकडून जाहीर.. भारत शत्रू की मित्र..?

Advertisement

युद्ध रशिया-युक्रेनचे पण, भारतीयांना बसणार ‘असा’ फटका; पहा, कोणत्या वस्तू होणार जास्त खर्चिक..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply